रिलायन्सला झटका : रिलायन्सचा ‘तो’ व्यवहार अयोग्य; याचिका फेटाळली

मुंबई :

लॉकडाऊनच्या दरम्यान मोठ्या जोमात आणि जोरात असणारी रिलायन्स हापकली आहे. शेअर मार्केटमध्येही देशातील सर्वात मोठी कंपनी असणारी रिलायन्सच्या  शेअर्सची किंमत खाली उतरली आहे. आता अशातच रिलायन्सला न्यायालयाने अजून एक झटका दिला आहे.

बाजार नियंत्रक सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीज आणि तिच्या इतर बारा उपकंपन्यांना या क्षेत्रात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे कारण या कंपन्यांनी इक्विटी डेरिवेटिव्हमध्ये व्यवहार करताना अयोग्य व्यवहार केला आहे, अशी भूमिका बाजार नियंत्रक सेबीची आहे. या बंदीमुळे रिलायन्सने आपल्या उपकंपन्यासह न्यायालयात या प्रकरणाविरुद्ध याचिका दाखल केली. मात्र या विरोधात रिलायन्स इंडस्ट्रीने सिक्‍युरिटीज ऍपेलाईट ट्रायब्युनल (सॅट) मध्ये दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे.

रिलायन्स पेट्रोलियम मधील शेअर विकताना हा अयोग्य व्यवहार झाल्याचे सेबीने म्हटले आहे. मात्र निर्णयाबाबत रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. आम्ही केलेला व्यवहार योग्य आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असे रिलायन्स इंडस्ट्रीजने सांगितले. कायदेशीर सल्ला घेऊन नियमाप्रमाणे रिलायन्स पेट्रोलियम संदर्भात व्यवहार केला होता, असे कंपनीचे म्हणणे आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here