‘व्हाटस्अॅप’ने आणले ‘हेही’ फिचर; गुगल, अमेझॉनसह अनेकांना मोठा झटका..!

सध्या कोणत्याही मोबाईलमध्ये दोन अॅप्लिकेशन असतात म्हणजे असतात. ते दोन म्हणजे फेसबुक आणि व्हाटस्अॅप. एकाच कंपनीच्या मालकीच्या असलेल्या व्हाटस्अॅपने आता UPI बेस्ड पेमेंट सिस्टीम आणण्याची तयारी केली आहे.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) या केंद्र सरकारच्या संस्थेने युपीआय UPI आधारित पेमेंट सेवा देण्यासाठी व्हाटस्अॅपला हिरवा कंदील दाखवला आहे. सध्या यासाठी बाजारात पेटीएम, फ्लिपकार्ट, गुगल पे, अमेझॉन पे, फोन पे असे अनेक अॅप्लिकेशन जोमात आहेत. मात्र, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असलेल्या व्हाटस्अॅपनेही अशाच पद्धतीचे फिचर आणण्याची तयारी केल्याने त्या कंपन्यांना मोठा झटका बसणार आहे.

सध्या भारतात किमान 45 कंपन्या अशा पद्धतीने पेमेंट अॅप्लिकेशन सेवा देत आहेत. त्यामध्ये किमान २ कोटी ग्राहक जोडले गेलेले आहेत. तसेच १४० पेमेंट बँकांनीही अशी सेवा देण्यास सुरुवात केलेली आहे. त्यात आता फेसबुक कंपनीच्या व्हाटस्अॅपची भर पडणार आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here