धक्कादायक : तर ट्रम्प घेऊ शकतात ‘हा’ निर्णय; मग वाढेल बायडेन व अमेरिकेची डोकेदुखी

अमेरिकेचे अध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीच्या रिंगणात मतदारांनी थेट घराचा रस्ता दाखवला आहे. त्याचवेळी मतदानाचे कट्टरपंथीय पद्धतीने ध्रुवीकरण करण्यात यश आलेले ट्रम्प हे अमेरिकन इतिहासातील पहिले अध्यक्ष ठरले आहेत. तासेक त्यांची एकूण राजकीय अभिलाषा लक्षात घेता ते निवडणूक हरल्यावर शांत न बसता सत्तेला आव्हान देऊन अमेरिकेत अराजकता माजवण्यासाठीचे प्रयत्न करतील अशीच शक्यता वाटत आहे.

यापूर्वीच्या अध्यक्षांनी निवडणुकीतून पराभव पदरी पडल्यास किंवा दुसरी टर्म पूर्ण केल्यावर शक्यतो थेट राजकीयदृष्ट्या काहीही केलेले नाही. ती अमेरिकन राजकारणाची परंपरा मानली जाते. मात्र, ट्रम्प यांचे तसे होईल असे वाटत नाही. एकतर मतदारांमध्ये कट्टरपंथीय विष पेरण्यात त्यांनी यश मिळवले आहे. त्याचवेळी पराभव मान्य न करीत थेट न्यायालयाचे दार ठोठावताना थेट बोगस मतदानाचे आरोप त्यांनी केले आहेत.

आपला पराभव होऊच शकत नाही अशीच ट्रम्प यांची धारणा आहे. अशावेळी ट्रम्प जरी न्यायालयीन लढाई हरले तरीही शांत बसतील असे नाही. उलट ते जानेवारीत बायडेन अध्यक्ष बनले की अमेरिकेत रस्त्यांवरील लढाई लढू शकतात. त्यांच्या रीपाब्ल्कन कार्यकर्त्यांनी यास दुजोरा दिलेला आहे. एकूणच अशावेळी मोठा गोंधळ उडून तिथे अशांतता निर्माण होण्यास मदत होईल.

२०१४ च्या निवडणुकीची तयारी पुन्हा एकदा ट्रम्प करू शकतात किंवा मुलगी इवंका हिच्यासाठीचे प्रयत्न करूनही ते राजकीयदृष्ट्या सक्रीय राहू शकतात. बायडेन जिंकल्यावर जरी त्यांना व्हाईट हाउस आणि हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्समध्ये मोठा पाठींबा असेल. मात्र, त्याचवेळी त्यांना सिनेटमध्ये तितका भक्कम पाठींबा नसेल. त्याचाच फायदा घेऊन ट्रम्प बायडेन यांना अडचणीत आणू शकतील असा अनेकांचा अंदाज आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here