धक्कादायक : ट्रम्प यांच्या ‘त्या’ दाव्याने जग झाले हैराण; नेमके काय होणार याकडे लागले लक्ष

यंदा पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बसण्याची तीव्र इच्छा असलेल्या रिपब्लिकन पार्टीचे नेते व अध्यक्ष ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पार्टीच्या जो बायडेन यांनी मोठा झटका दिला आहे. मोठ्या प्रमाणात मतदारांनी बायडेन यांच्यावर विश्वास दाखवला आहे. मात्र, त्याचवेळी बायडेन यांचा विजय हा चोरीचा मामला असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत नेहमीच्या पद्धतीने अजब-गजब दावे करून ट्रम्प यांनी अवघ्या जगाला कोड्यात टाकले आहे. निवडणुकीतील गोंधळ आणि मतदान चोरून विजयी होण्याची परंपरा भारत, सिरीया, पाकिस्तान, रशिया यांच्याकडे आहे. अशावेळी अशीच परंपरा आत अमेरिकेत रुजत असल्याचा धक्कादायक आरोप ट्रम्प यांनी केला आहे. पोस्टल मतदानातील चोरीमुळे त्यांचा पराभव होत असून ते अवैध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कोर्टात जाऊन याच्या विरोधात थेट आव्हान देण्याची घोषणा ट्रम्प यांनी दिली आहे. त्याचवेळी अमेरिकेत असे काहीही झाले नसल्याचा दावा बायडेन यांच्या टीमने केला आहे. बायडेन यांनी अजूनही यावर अधिकृतरीत्या प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, ट्रम्प यांच्या या आरोपाने अमेरिकेत चर्वण सुरू झालेले आहे. अनेकांनी हा दावा निराधार असून ट्रम्प खोटे बोलत असल्याचे सोशल मीडियामध्ये लिहिण्यास सुरुवात केली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here