झुनझुनवालांनी कमावले 207 टक्के रिटर्न; पहा कोणत्या शेअरनी दिलीय त्यांना बम्पर ग्रोथ

सुप्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट गुरु म्हणून राकेश झुनझुनवाला यांची ओळख आहे. त्यांनी करोनाच्या काळातही आपल्या एकूण गुंतवणुकीच्या जोरावर तब्बल 207 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळवले आहेत.

मागील आठ महिन्यात भारतीय शेअर बाजाराने तब्बल 60 टक्के इतकी ग्रोथ कायम राखली आहे. त्याचवेळी झुनझुनवाला आणि अनेकांनी आपल्या गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवला आहे. एकूणच करोना कालावधीत अनेकांना खायचे वांधे झालेले असतानाही शेअर बाजाराने अनेकांना बेस्ट परतावा दिला आहे.

झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील कोणत्या शेअरने मार्चनंतर किती परतावा दिलाय याचे आकडे असे :

एनसीसी लिमिटेड : 35 टक्के

रैलीज इंडिया : 10.31 टक्के

जुबिलेंट लाइफ साइंस : 207 टक्के

Escorts लिमिटेड : 141 टक्के

टाइटन कंपनी : 69 टक्के

ल्यूपिन फार्मा : 79 टक्के

टाटा मोटर्स : 119 टक्के

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here