6000mAh बॅटरीसह जबरदस्त फीचर्स असणारा ‘या’ कंपनीचा फोन मिळतोय अवघ्या ६,९९९ रुपयात

मुंबई :

आजकाल आर्थिक संकटामुळे लोक स्वस्तात मस्त मिळणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देत आहे. टेक्नोलॉजी असो वा भाजी खरेदी सध्या स्वस्तात मस्त वस्तूंची सध्या चलती आहे. 6000mAh बॅटरीसह जबरदस्त फीचर्स असणारा फोन इनफिनिक्सने भारतात लाँच केला आहे. विविध तगडे फीचर्स असणारा हा Infinix Smart 4 फोन अवघ्या ६,९९९ रुपयात मिळत आहे.

इनफिनिक्स कंपनीचा हा लेटेस्ट स्मार्टफोन बजेट सेगमेंट हँडसेट आहे. कंपनीनेया फोनला २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेजसोबत लाँच केले आहे. फोनचा सेल ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे.

अशी आहेत या स्वस्तात मस्त फोनची वैशिष्ट्ये :-

  • फोनमध्ये 720×1640 पिक्सल रेजॉलूशन, ६.८२ इंचाचा एचडी प्लस InCell IPS डिस्प्ले
  • डॉट नॉच डिझाइन
  • २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेजच्या
  • मीडियाटेक हीलियो ए२२ प्रोसेसर (फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते)
  • ड्यूल रियर कॅमेरा सेटअप
  • १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, एक डेप्थ सेन्सर
  •  
  • एलईडी फ्लॅश सोबत ८ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर
  • 6000mAh बॅटरी, १० वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट
  • माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरच्या या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ 4.2 आणि 3.5 mm हेडफोन जॅक

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here