असा बनवा ‘छोले मसाला’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा

आज आम्ही आपल्याला छोले मसालाची हटके रेसिपी सांगणार आहोत. ज्याची चव आणि स्वाद अप्रतिम आहे. विशेष म्हणजे हा पदार्थ बनवायला फार वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्ही सहज हा पदार्थ ट्राय करू शकता. नक्कीच बनवा आपल्याला आवडेल.

साहित्य घ्या मंडळी…

 1. 3/4 कप छोले(रात्री भिजत घालणे)
 2. 3/4 कप कांदा
 3. 1 कप टोमॅटो
 4. 1 टीस्पून जीरे
 5. 1.5 टीस्पून आलं लसुण पेस्ट
 6. 1 टीस्पून लाल तिखट
 7. 1 टीस्पून गरम मसाला(मी केलेला)
 8. 1 टीस्पून धणे पुड
 9. 1/2 टीस्पून हळद
 10. 1 टीस्पून मीठ
 11. 3 टेबलस्पून तेल
 12. 2 टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर

हे साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला…

 1. छोले रात्री भिजत घालणे किंवा 5/6 तास भिजवणे
 2. साधारण 1कप पाणी घालून कुकरमधे चवीपुरते मीठ घालून मिडीयम गॅस वर 6/7 शिट्या देऊन शिजवून घेणे. जरआलं लसुण पेस्ट नसेल तर करा.टोमॅटो नि कांदा अर्धा बारीक चिरून नि अर्धा मोठा.जे मोठे चिरलेय ते मिक्सर मधून पेस्ट करून घ्या.
 3. एक कढईत 3 टेबलस्पून तेल टाका गरम झाले कि त्यात जीरे नि तेजपत्ता,दालचिनी फोडणीत घाला जीरे फुलले कि चिरलेला कांदा घाला ब्राऊन होईस्तो परतावा नंतर त्यात चिरलेला टोमॅटो नि केलेले वाटण घालावे तेल सुटेपर्यंत परतावे.
 4. नंतर आललसुण पेस्ट, धणेपुड,गरमसाला,हळद,लाल तिखट घालून छान परतावे मीठ घालावे व त्यात उकडलेले छोले घालून पाच मिनिटे परतावे व पाणी कमी वाटल्यास 1/2 कप पाणी घालावे व झाकण ठेऊन चांगली भाजी 10 मिनिटे उकळू द्या.
 5. छोले तयार आहेत त्यामधे छान कोथिंबीर घाला नि पराठा,कुलचा,भटुरे कशा बरोबर ही खा.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here