अशा बनवा ‘ताकातल्या खमंग पुऱ्या’; रेसिपी वाचा एका क्लिकवर

बऱ्याचदा आपल्या घरी असं होतं की पुऱ्या किंवा पोळ्या ऊरलेल्या असतात. मग त्याचे तेच ते पदार्थ करून कंटाळा आलेला असतो. उरलेलं अन्न वाया घालवावेसे वाटतही नाही. मग आता करायचे काय? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. त्यावर उपाय म्हणजे ‘ताकातल्या खमंग पुऱ्या’. कधीतरी असा प्रकार करून रूचिपालट करावा. ही रसदार न्याहारी आपल्याला नक्कीच भावेल. पु-या असल्यास अगदी कमी तेल वापरावे.

साहित्य घ्या मंडळीहो…

7-8 पु-या किंवा 3-4 पोळ्या

1 टीस्पून बेसन

2 टीस्पून तेल

1/2 टीस्पून मीठ

1/2 टीस्पून जिरेमोहरी

2 हिरव्या मिरच्या

1/4 टीस्पून हळद

4-5 पाकळ्या लसुण

2-3 कढिपत्ता पाने

2 टीस्पून तेल

1/2 कप आंबट ताक

1 पिंच साखर

हे साहित्य घेतले असेल तर बनवायला पण सुरुवात करा की….

प्रथम गॅसवर भांडे घेऊन तेल गरम करायला ठेवावे. पु-यांचे चार भाग करावे. गरम तेलामध्ये जिरेमोहरी तडतडल्यावर चिरलेली मिरची, चिरलेला लसुण व कढीपत्ता घालावा.

त्यानंतर हळद घालुन तेलावर हळद झाल्यावर साधारण 1/2 कप पाणी घालावे. पाण्याला ऊकळी आल्यावर मीठ व पु-यांचे तुकडे घालुन त्यावर बेसन घालावे. बेसनाने रस्सा घट्ट होऊन छान स्वाद येतो. सर्व जिन्नस हळुवार मिसळावे. व मंदगॅसवर होत असतांनाच ताक व साखर घालावी.

दोन तीन मिनिटे वाफेवर झाल्यावर गॅस बंद करावा. हेल्दी न्याहारी तयार आहे.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here