अमेरिकी निवडणुकीमुळे सोन्याच्या दरावर झाला परिणाम; घट होऊनही ‘अशी’ आहे परिस्थिती

मुंबई :

जगभराती राजकीय वर्तुळाचे आणि आर्थिक जगताचे लक्ष अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालाकडे लागलेलं आहे. सोने, इंधन, शेअर मार्केट या क्षेत्रावर निवडणुकीचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. दरम्यान एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की, सध्या तरी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांच्या बाजूने निकाल आहेत. मात्र विभाजित सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमुळे बाजारावर परिणाम होत आहे. कारण सिनेटवर संभाव्य रिपब्लिकन पार्टीचे नियंत्रण असल्याने प्रमुख बिले रोखली जाऊ शकतात.

दरम्यान सध्याच्या ट्रेंडनुसार, जो बिडेन यांना ऐतिहासिक विजय मिळेल. तथापि, अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चुरशीची लढत देत आहेत. अमेरिकेच्या प्रशासनात बदल झाल्यास प्रोत्साहनपर पॅकेज येऊ शकतात, ज्यामुळे बाजाराची गती बदलेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकन निवडणुकीच्या दिवशी, स्पॉट गोल्डचे दर ०.३% नी घसरले व ते १९०३.२ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले.

महागाई आणि चलनातील अवमूल्यन स्थितीत सोने नेहमी उपयुक्त ठरते. अर्थव्यवस्थेत वित्तीय प्रोत्साहन मिळाल्यास सोन्याचे दर सहसा वाढतात. सिनेटवर रिपब्लिकन्सचे नियंत्रण येण्याची शक्यता असल्याने अंतिम निकालानंतर कोव्हिड-१९ चे प्रोत्साहन पॅकेज ते कदाचित नाकारू शकतात. कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत घट नाहीच, त्यामुळे संपूर्ण युरोप आणि जगातील काही भागांमध्ये उपाययोजना म्हणून लॉकडाऊनची मालिकाच सुरू आहे. बाजारातील जोखीमीची भावनाच कमी होत आहे. परिणामी सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याला आधार मिळत आहे. निवडणुकीनंतर कमोडिटी मार्केटवर मार्ग शोधण्यासाठी निवडणुकीनंतर फेडरल ओपन मार्केट कमिटी (एफओएमसी) च्या बैठकीकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.

निवडणूक निकालाच्या अखेरच्या दिवशी डॉलरचे मूल्य सुधारताना दिसत असून बुधवारी अमेरिकेच्या डब्ल्यूटीआय क्रूडच्या किंमती २.३ टक्क्यांनी वाढल्यानंतर गुरुवारी सकाळी १ टक्क्यांनी वाढल्या. ३ महिन्यातील ही विशेष वृद्धी ठरली. तेलाचे दर ४० सेंटनी घसरून ३८.७५ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. तर दुसरीकडे ब्रेंड क्रूडचे दर १ टक्क्यांनी किंवा ४१ सेंटनी घसरून ४०.८२ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. अमेरिकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि २०२१ साठीचे अध्यक्ष घोषित होईपर्यंत तेलाच्या किमतीतील अस्थिरता आणखी काही दिवस तशीच राहण्याची शक्यता आहे. डॉलर आणि तेलाच्या किंमतीत व्यस्त संबंध असल्याने बुधवारी डॉलरची कामगिरी खालावली, मात्र गुरुवारी तो मजबूत स्थितीत आाला. सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत केलेल्या अवाजवी दाव्यांमुळे बुधवारी तेलाचे दर सुरुवातीला वाढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here