श्रीरामपूर शहरातील देहव्यापार सुरु असणाऱ्या लाॅजवर छापा; वाचा, काय आहे प्रकरण

अहमदनगर :  

श्रीरामपूर शहरातील पंचशिल लाॅजवर अवैध देहव्यापार सुरु असल्याच्या मिळालेल्या माहितीवरुन पोलिस उपाधिक्षक संदिप मिटके यांच्यासह विशेष पोलिस पथकाने छापा टाकुन तीन मुलीची सुटका केली.

या छाप्यात तीन मुलींची सुटका करण्यात आली असून लाॅज व्यवस्थापक गणेश खैरनार यास ताब्यात घेतले आहे. दि. ५ रोजी दुपारी वाजता श्रीरामपुरातील पंचशिल लाॅजवर पोलिस उपाधिक्षक संदिप मिटके, आयपीएस पोलिस अधिकारी आयुष नोपाणी, पोलिस निरिक्षक मसुद खान, हेड काॅस्टेबल आर. एच. आरोळे, एस. जी. औटी, पो. काॅ. एबी पठाण, एम. एस. चव्हाण, महिला पोलिस नाईक जे. आर. घाडगे यांच्या पथकाने छापा टाकला.

तेथे तीन मुली आढळुन आल्या आहेत.पोलिस नाईक आश्विनी पवार यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन लाॅज व्यवस्थापक गणेश खैरनार याच्याविरोध्दात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सायकांळी उशिरा शहरातील बोरावके नगर मधील सिल्वर स्पून या हाॅटेल्सवरही पोलिसांनी छापा टाकुन अवैध दारु जप्त केली आहे. पोलिसांनी याबाबत दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असुन रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here