मोदीराजमध्ये ‘त्या’ समाजावरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ; आमदार कानडेंचा गंभीर आरोप

अहमदनगर : (प्रेसनोट)

केंद्रामध्ये आरएसएस प्रणित भाजपचे मोदी सरकार आल्यापासून देशामध्ये मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समाजावरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही चिंतेची बाब आहे. मोदी सरकारला संविधानच मान्य नसून समानतेचा विचार मांडणार संविधानच बदलून टाकण्याच षड्यंत्र देशात सुरू आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार लहू कानडे यांनी केला आहे. 
मागासवर्गीय,अल्पसंख्याक समजावरील अत्याचाराच्या विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या पुढाकारातून याबाबत नगर शहरामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. कानडे बोलत होते. मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालून अभिवादन करत काँग्रेसच्या वतीने शांततामय पद्धतीने धरणे आंदोलन करण्यात आले. 
यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समाज हा कायम काँग्रेस पक्षाच्या विचारासोबत राहिलेला आहे. आज या समाजावरती सुरू असलेला अन्याय हा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तीव्र संताप निर्माण करणारा आहे. देशभरात सुरू असणाऱ्या अन्यायाच्या घटनांचा आम्ही निषेध करतोच, परंतु नगर शहरामध्ये देखील मागासवर्गीय, अल्पसंख्यांक बांधवांवर जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा काँग्रेस ही संपूर्ण ताकदीनिशी समाज बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल. 
शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाज काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावरती संघटित होत असून काळे यांच्या अन्यायाविरुद्ध कणखरपणे उभ राहण्याच्या भूमिकेचं यावेळी दोन्ही विभागांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत करत मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाज काळे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याची भूमिका यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मांडली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here