भाजप अध्यक्षांचा अजब दावा : ‘म्हणून’ ट्रम्पचा पराभव; मात्र मोदींनी…

दिल्ली :

सध्या अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जोरात चर्चेत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. कारण जो बिडेन हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. अशातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी एका अजब दावा केला आहे. ‘करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात ट्रम्प अयशस्वी ठरल्यामुळे त्यांचा पराभव होत आहे. परंतू १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला पंतप्रधान मोदी यांनी योग्यवेळी लॉकडाउनचा निर्णय घेत लोकांचे प्राण वाचवला आहे’, असे विधान त्यांनी भरसभेत केले.

यावेळी नड्डा हे बिहारमधील दरभंगा येथील प्रचारसभेत बोलत होते. बिहार विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यातील प्रचारसभा चालू आहेत. जो बायडन यांना 264 इलेक्ट्रोल वोट्स मिळाले तर डोनाल्ड ट्रम्प यांना 214 वोट्स मिळाले आहेत. दोन दिवसांच्या मतमोजणीनंतर जो बायडन यांना विजयासाठी 6 मतांची गरज आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांचा विजयाचा मार्ग खडतर झाला आहे. जो बायडन यांनी जोरदार मुसंडी मारत विस्कॉन्सिन,मिशिगन या राज्यांमध्ये विजय मिळवला. नेवादा या स्विंग स्टेटमध्ये त्यांना 6 मतं मिळाल्यास ते विजयी होऊ शकतात. नेवादामधून बायडन आघाडीवर आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here