दिवाळीत घ्या खबरदारी; कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने सांगितले ‘हे’ नियम

मुंबई :

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी अद्यापही कोरोना आटोक्यात आलेला नाही. अशातच दुसरी लाट येण्याची शक्यता समोर आलेली आहे. अशी एकूण परिस्थिती असताना दिवाळीमुळे राज्य सरकारची चिंता अधिकच वाढलेली आहे. त्यामुळे सरकारने सुरक्षा नियमावली जाहीर करत या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

  • दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी.
  • दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा.
  • धार्मिक स्थळ अद्याप खुली केलेली नाही त्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा.

दरम्यान, कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा प्रयत्न आहे. हिवाळ्यात आधीच प्रदुषणात वाढ होते. त्यात फटाक्यामुळे जास्त प्रदुषण होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतरच दुसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने राज्य सरकार सावध झालं आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here