२०१९ची ‘त्यांची’ आत्महत्या, चिठ्ठीत उद्धव ठाकरेंचे नाव; भाजप नेत्याने दिले ‘हे’ आव्हान

मुंबई :

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात थेट सूसाईड नोटमध्ये नाव असणाऱ्या ‘रिपब्लिक टीव्ही’च्या अर्णब गोस्वामी यांना काल सकाळी अटक करण्यात आली. यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत माध्यमांची गळचेपी केली जात असल्याचे म्हटले. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले. मागच्या वर्षी (२०१९) एप्रिल महिन्यात उस्मानाबादमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. आत्महत्या करताना शेतकऱ्याने चिठ्ठीत ओमराजे निंबाळकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव लिहून ठेवले होते. याच पार्श्वभूमीवर ‘स्वतःला अटक कराल काय?’, असा सवाल भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे.

यावेळी त्यांनी ‘स्वतःला फरफटत. दाखवून द्या न्याय सगळ्यांसाठी एक असतो’, असे आव्हानही दिले आहे. दरम्यान राणे यांनी ‘तब्बल 300 कोटींचा मालक 5 ते 6 कोटींसाठी आईबरोबर आत्महत्या करतो, हे मला पटत नाही, यात काही वेगळंही कारण असू शकतं आणि त्याची उत्तरं महाराष्ट्राला मिळायला हवीत’, असे म्हणत आपले म्हणणे मांडले आहे. राणेंनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यामुळे सदर प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री या दोघांनीच का आत्महत्या केली हे पटत नव्हतं. म्हणून अलिबागमध्ये स्थानिकांकडून माहिती काढल्यानंतर असं कळलं की त्यांची परिस्थिती इतकी वाईट नव्हती. त्यांनी आत्महत्या केली त्याचं कारण पैसे होऊ शकत नाही, ती आत्महत्या नाही, असं अलिबागमधील काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे सत्य बाहेर पडेलंच,असे ट्वीटही राणे यांनी केले आहे. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here