म्हणून पडतोय दुष्काळ; ही धावाधाव थांबली तरच होईल आपली प्रगती

आपल्या देशात अनेक समस्या आहेत पण  माझ्या दृष्टीने सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे पाण्याची. आज गावोगावी दुष्काळ पडला, उन्हाळा सुरू झाला की चर्चा सुरू होते आता आपल्या पाण्याचे कसे? दोन -तीनल वर्षे झाला की दुष्काळ पडतोच मग गावागावात सुरू होतात टँंकर, छावण्या, अन पाण्यासाठी धावाधाव..!


आपल्या देशात इतर राष्ट्रांपेक्षा जास्त पाऊस पडुनही दुष्काळ का पडतो? दरवर्षी आपल्यालाच पाण्यासाठी का संघर्ष करावा लागतो? याचे कारण आपण पाण्याचे नियोजन करत नाही पाणी अडवत नाहीत.

दुष्काळ हा निसर्गनिर्मित नसुन मानवनिर्मित आहे अस मला वाटत. पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे अमृतमय धारांचा वर्षाव पाणी म्हणजे या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांसाठी एक संजीवन प्रेरणा आहे. मनुष्याला आणि पिकांना पाण्याशिवाय जगताच येणार नाही. आजच्या काळात डोंगर कपारीमधील झरे नाहीसे झाले आहेत. तळ्याचे करचा डेपो होत आहेत. नद्यांची सार्वजनिक गटारे होत आहेत. ग्रामीण भागातील पाणी साठवणीचे आड तर केव्हाच नजरेआड झाले आहेत. पाणी पुरवठा करणारे जलस्त्रोत लुप्त झाले आहेत. पाणी अडविण्या ऐवजी 300 ते 400 फुट खोल जमीनीतुन पाणी उपासण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. पडलेल्या पावसाचे पाणी आले तर तसे वाहून जात आहे. पाण्याची ही परिस्थिती आम्हीच किती गंभीर करून टाकली आहे. दुरवरचे दिसते मला पण बघु शकत नाही माझ्यात मी, कळू शकतो मला भिंतीवरचा मजकूर पण वाचता येत नाहीत, मला माझ्याच हातावरच्या रेषा॥ अशी आपली अवस्था झालेली आहे पण अजुनही वेळ गेलेली नाही. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहेत हे लक्षात घेऊन गावोगावी पाणी आडवा, पाणी जिरवा ही लोकचळवळ झाली पाहिजे.

गावातील तरूणांनी, वृद्ध, माता -भगिंनींनी जात-धर्म,राजकारण, गट-तट बाजुला सारून सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने पाण्याचे नियोजन केले व नियोजनाला तंत्रज्ञानाची जोड दिली, त्याची योग्य देखरेख केली तर पाण्याचा निर्माण होणारा प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होईल.
पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचविण्याचा प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी शासनाच्या, स्वयंसेवी संस्थांच्या अनेक योजना आहेत. यातील जलयुक्त शिवार योजना, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा यात सहभाग घेऊन नियोजन करणे शक्य आहे.

चर्चा करण्यात वेळ वाया घालवू नका तर प्रत्यक्ष कामाला सुरूवात करा, म्हणुन म्हणावस वाटत, सांगावस वाटत पाणी आडवा पाणी जिरवा, होईल आपला परिसर हिरवा, गावचं पाणी गावात, शिवारातलं पाणी शिवारात परसातल पाणी परसातच आडवा, पाणी आडवा, पाणी जिरवा. पळणार्‍या पाण्याला चालविणे व चालणार्‍या पाण्याला थांबविणे हे तत्व लक्षात घेऊन काम केले तर जमिनित पाणी मुरवता येईल यामुळे गावात सुटले प्रश्न पिण्याच्या पाण्याचा, सुटल प्रश्न अन्न धान्याचा सुटेल प्रश्न रोजगार निर्मितीचा, म्हणुन करू आपण निर्धार पाणी बचतीचा आणि अडविण्याचा.

कुणीतरी येईल, शासन करेल या आशेवर बसु नका गावोगावी लोकचळवळ सुरू झाली आहे. लोकसहभागातुन गावं सुधारत आहेत. पाणी फाउंडेशनमध्ये सहभागी झालेल्या गावांची कहाणी ऐका, अंगावर शहारे येतात. शुन्यातुन सुरूवात करून आज ती गावे नंदनवन झाली आहेत मग आपण मागे का?

लोकसहभागातुन पडीक जमीनीवर, माळरानावर, मोकळ्या जागेत, ओढे, नाले, नदी या ठिकाणी पाणी अडवणे शक्य आहे. याचबरोबर झाडे लावणे काळाची गरज आहे. झाडे लावुन जगवल्याने मातीची धुप थांबेल व झाडाखाली पडलेल्या पाचोळल्यामुळे आणि ताबडतोब पाहून जाणार नाही. त्याचप्रमाणे झाडांच्या मुळांनी जमीन मोकळी होते व त्यातही पाणी मुरल्यास वाव मिळतो. झाडांमुळे सुर्याची किरणे सरळ जमिनीवर पडत नाहीत. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपण वाचतो. त्यांचे गडकिल्ले डोळे भरून पाहातो. हे पाहून छाती अभिमानाने फुगते. गडकिल्ले पाहताना त्यांनी केलेले पाण्याचे नियोजन पहा. त्याच्या काळातील पाणी अडवा, पाणी जिरवा संकल्पना पहा अरे माझ्या राजांकडे एवढी दुरदृष्टी साडेतीनशे वर्षापुर्वी होती. त्यांनी त्या काळात पाण्याचे नियोजन केले, झाडे लावली. मग आम्ही हतिहासातून नेमके काय शिकतो?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तळी खोदली, गावोगावी आड खोदले, पाणी अडवले, झाडे लावली. इतिहास फक्त वाचायचा नसतो तर त्यातुन आपण शिकायच असतं आतापर्यंत आपण याची अडवली, त्याची जिरवली यातच आपला वेळ गेला, आयुष्य चाललय आता पाणी आडवा, पाणी जिरवा हीच काळाची गरज आहे. पाण्याची खरी किंमत  जाणून घ्यायची असेल तर चार पाच किलोमिटर चालत जाऊन हंडे डोक्यावर आणणार्‍या महिलांना विचारा. जर किंमत कळली नाही तर दुषित पाणी पिऊन अंथरूधणावर खिळलेल्या लोकांना विचारा.

अहो! ऐवढे सांगुन सुद्धा कळत नसेल तर पाऊस पडला नाही पिकांना पाणी मिळाले नाही. म्हणुन पिके करपुन गेल्याने कर्जबाजारीपणाचा डोंगर बाजुला टाकुन आत्महत्या केलेल्या गरीब बिचार्‍या शेतकर्‍यांच्या कुटुंबाला विचारा! आणि आता तरी जागे व्हा.
आपला महाराष्ट्र तर दर्‍या डोंगरांनी नैसर्गिक विविधतेतून नटलेला आहे. पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवून ते जमिनीत जिवरलं, मुरवलं तर महाराष्ट्र एक आदर्श राज्य होईल.

ज्या  गावात पाणी आडवा पाणी जिरवा मोहिम राबविली तेच गावे आज आदर्श गाव म्हणुन नावारूपास आली आहेत. हिवरेबाजार, राळेगणसिद्धी, सातारा जिल्हातले बेळूगाव, औरंगाबाद जवळचे पाटोदा गाव अशी शेकडो गावे आदर्श ठरली आहेत. मग माझेच गाव मागे का? याचा प्रत्येकाने विचार करावा.

किसन आटोळे (सर)

पत्ता : वाहिरा, ता. आष्टी, जि. बीड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here