कोंबड्यांमधील अंडी उत्पादन वाढीसाठी हे आहेत नैसर्गिक उपाय; वाचा, कसा होईल फायदा

हिवाळ्यात कोंबड्यांच्या उत्पादन क्षमता घटते. कारण हिवाळ्यात जेव्हा अतिथंडी पडते तेव्हा पक्षांवर अतिताण येतो. परिणामी उत्पादनात घट होऊन पक्षांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते त्याचा थेट परिणाम अंडी उत्पादनावर होऊन अंडी उत्पादन संख्येत कमी येते. म्हणूनच आज आपण कोंबड्यांमधील अंडी उत्पादन वाढीसाठी नैसर्गिक उपाय जाणून घेणार आहोत.

प्रत्येक कोंबडीच्या जातीची अंडी उत्पादन करण्याची क्षमता ही वेगवेगळी असली तरी वर्षाकाठी अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबड्या साधारणतः 280-310 अंडी देतात. सरासरी 310 ही अंडी उत्पादन क्षमता असली, तरी याच्या 90 टक्के एवढेच उत्पादन कोंबड्यांकडून मिळते. अंडी उत्पादन काळात जास्तीत जास्त उत्पादन मिळण्याकरिता औषधी वनस्पतींचा चांगला उपयोग होतो.

जाणून घ्या वनस्पती आणि त्यांच्या वापराविषयी :-

  • – मेथी या वनस्पतीच्या “बी’ 10 ग्रॅम प्रति 100 पक्षी अशी खाद्यातून नियमित मात्रा द्यावी.
  • – जिवंती ही वनस्पती अतिशय उपयोगी आहे. अंडी उत्पादन वाढीसह दुध उत्पादन वाढण्यासाठीसुद्धा जनावरांना ही वनस्पती दिली जाते. प्रति पक्षी 0.5 ग्रॅम या प्रमाणात वनस्पतीची मात्रा असावी.
  • – शतावरी या वनस्पतीच्या मुळाची पावडर  प्रति पक्षी 0.5 ग्रॅम या मात्रेमध्ये पक्षांना द्यावी. वयाच्या 10व्या आठवड्यापासून 0.25 ग्रॅम प्रति पक्षी या मात्रेत या वनस्पतीचा वापर केल्यास पक्षाच्या अंडी उत्पादनात वाढ होते.
  • – या तिन्ही वनस्पती तुम्हाला उपलब्ध होत असतील तर यांचे मिश्रण करूनही पक्षांना खाद्य देता येते. 

असे करा मिश्रण :-

  • 45 ग्राम शतावरीच्या मुळाची पावडर घ्या. त्यात 45 ग्राम जिवंती घाला. मेथी मात्र अगदी कमी म्हणजे 10 ग्राम घेतली तरी चालेल. 10 ग्रॅम प्रति 100 पक्षी या मात्रेत दररोज पक्ष्यांच्या खाद्यातून द्यावी. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here