केळीपासून बनवू शकता ‘इतके’ पदार्थ; अशा प्रकारे उभा राहू शकतो मोठा व्यवसाय

आपल्या कृषी उत्पादन आणि कृषी प्रक्रिया या दोन्ही शब्दांना अगदी अल्प स्वरुपात पहिले जाते. मात्र कृषी प्रक्रिया उद्योगाचे स्वरूप एवढे मोठे आहे की आपण फक्त एखाद्या फळाला घेऊन जरी प्रक्रिया उद्योग सुरु केला तरीही मोठा व्यवसाय उभा राहू शकतो. कृषी प्रक्रिया उद्योगात पडत असताना आपण त्यातील तांत्रिक बाजू समजून घेणे फार महत्वाचे असते. तसेच व्यवहाराची संपूर्ण माहिती घेणेही आवश्यक असते. आज आम्ही आपल्याला केळीपासून काय काय पदार्थ बनवता येऊ शकतात याविषयी माहिती देणार आहोत. पदार्थ बनवण्यासाठी माप, त्या पदार्थाला असणारी मागणी आणि इतर विषयांवर माहिती देणार आहोत.

  • केळीचे चिप्स बनवण्यासाठी केली पूर्ण वाढलेली लागतात. ती केली थोडी परिपक्व झालेली असावीत. सध्या  केळी सोलण्याचे तसेच केळीच्या चकत्या करण्याचेही मशीन विकसित करण्यात आले आहे. केळीचे चकते पांढरेशुभ्र होण्यासाठी ०.१ टका सायट्रिक अॅसिड किंवा पोटेंशियम मेटबाय सल्फाइडच्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुड़नून ठेवावेत. विशेष म्हणजे देशभरात केळीच्या चीप्सला मोठी मागणी आहे. बटाटा चिप्सपेक्षाही केळीचे चिप्स जास्त किमतीला विकले जातात.
  • लहान मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये केळीच्या भुकटीचा वापर होतो. बिस्किटे व बेकरी तसेच आईस्क्रीममध्ये केळीच्या भुकटीचा वापर केला जातो. विशेष म्हणजे केळीच्या भुकटीला परदेशात भरपूर मागणी आहे. भुकटी बनवण्यासाठी पूर्ण पिकलेली केळीची साल काढून पल्पर यंत्राच्या सहाय्याने लगदा करून घेतात. केळीच्या गराच्या लगद्याची भुकटी स्प्रे ड्रायर किंवा ड्रम ड्रायर किंचा फोम मेंट ड्रायरच्या सहाय्याने करतात.
  • केळीपासून जेली आणि जॅम तयार केला जातो. सध्या ही जेली आणि जॅमचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत नाही परिणामी ती लोकांपर्यंत पोहोचत नाही. मात्र जेव्हा याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरु होईल, तेव्हा मात्र सर्रास ही जेली आणि जॅम घराघरात जाईल.

जेली बनवण्यासाठी प्रक्रिया :- ५० टक्के पक्र फळाचा गर पाण्यात एकजीव करून १५ ते २0 मिनिटे गरम करावा. गरगाळून घ्यावा. गाळलेल्या गरात समप्रमाणात साखर, ०.५ टक्के सायट्रेिक आम्ल व पेक्टीन टाकून उकळी येईपर्यंत शिजवावे. या वेळी मिश्रणाचे तापमान साधारणपणे १०४ अंश से.असते. तयार जेलीमध्ये एकूण घन पदार्थाचे प्रमाण ७० डिग्री ब्रिक्स इतके असते. जेली गरम असतानाच निर्जतुक बाटल्यांमध्ये भरावी.

जॅम बनवण्यासाठी प्रक्रिया :- गराच्या वजनाएवढी साखर मिसळून गर मंद अग्रीवर शिजवावा. साखर पूर्णपणे विरघळल्यावर ०.५ टक्के पेक्टीन, ०.३ टक्के सायट्रेिक आम्ल व रंग टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. मिश्रणाचा ब्रिक्स ६८ ते ७0 डिग्री झाल्यावर जॅम तयार झाला, असे समजावे. तयार जॅम कोरड्या व निर्जतुक बाटल्यांमध्ये भरावा. ह्या पदार्थ एक वर्षापर्यंत टिकू शकतो.

केळीपासून शेव, गुलाबजाम, बाकरवडी, व्हिनेगर, केली बिस्कीट, ज्यूस, बनाना प्युरी असे अनेक पदार्थ बनवले जातात. ज्यातून व्यवसाय उभा राहू शकतो.

संपादन :विनोदकुमार सूर्यवंशी

(या विषयावरील पुढील भाग उद्या दुपारी २ वाजता प्रकाशित होईल.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here