‘या’ भाजपा आमदाराने घेतली राज्यपालांची भेट; पोलिसांविरोधात केली ‘ही’ मोठी मागणी

मुंबई :

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात थेट सूसाईड नोटमध्ये नाव असणाऱ्या ‘रिपब्लिक टीव्ही’च्या अर्णब गोस्वामी यांना काल सकाळी अटक करण्यात आली. यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत माध्यमांची गळचेपी केली जात असल्याचे म्हटले. राज्यासह देशातील भाजप नेत्यांनी कुठल्या प्रकरणावरून अटक केली आहे हा विचार न करता थेट मविआ सरकारवर निशाणा साधला. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले. याच पार्श्वभूमीवर आमदार राम कदम यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

यावेळी ‘ज्या पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली, त्या ९ पोलिसांना तात्काळ निलंबित करा आणि त्यांची चौकशी करावी, पोलिसांबद्दल आदर असला तरी मारहाण योग्य नाही’, अशी मागणी कदम यांनी केली आहे.

दरम्यान कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहिले आहे. या पत्रात कदम यांनी म्हटले आहे की, अर्णब गोस्वामी यांना वरळी येथील घरातून रायगड पोलिसांनी अटक केली, या अटकेवेळी नियमांचे उल्लंघन करून पोलिसांनी अर्णब गोस्वामींना मारहाण केली. आम्ही पोलिसांच्या वर्दीचा सन्मान, आदर करतो परंतु ज्या ९ पोलिसांनी अशाप्रकारे पत्रकाराला मारहाण केली, ते देशातील समाज सहन करणार नाही. या ९ पोलिसांना निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here