म्हणून मिळाली नाही अर्णब गोस्वामींना पोलिस कोठडी; वाचा, काय होती कारण

मुंबई :

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात थेट सूसाईड नोटमध्ये नाव असणाऱ्या ‘रिपब्लिक टीव्ही’च्या अर्णब गोस्वामी यांना काल सकाळी अटक करण्यात आली. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात स्वतःचा न्यायाधीश असल्यासारखी वक्तव्ये करत थेट स्टुडीओत बसून न्यायदानाची भूमिका बजावणाऱ्या ‘रिपब्लिक टीव्ही’च्या अर्णब यांना  मुंबईतून अटक करून आणल्यानंतर रायगड पोलिसांनी त्यांना जवळपास 1 वाजता अलिबाग न्यायालयासमोर सादर केलं. 

पोलिसांना अर्णब गोस्वामी आणि इतर आरोपींची पोलीस कोठडी का पाहिजे, याच्यासाठी कोणताही सबळ पुरावा कोर्टासमोर सादर केला नाही. कोर्टानं कागदपत्रांअंती नोंदवलं निरीक्षणानुसार अर्णब गोस्वामी आणि इतरांना केलेली अटक अवैध होती.

ही आहेत कारणे :-

– या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी न्यायालयात तपासात काही निष्पन्न झाले नाही असा अहवाल दिला आहे. तो न्यायालयाने ग्राह्य धरला.

– आरोपींची पोलीस कोठडी घेण्यासाठी सबळ पुराव्याची गरज आहे. पोलीस कोठडीसाठी योग्य संयुक्तिक आणि सबळ कारण देता आले नाही.

– समरी रिपोर्ट मान्य झाल्यास पुन्हा केचा फेरतपास करण्यासाठी न्यायालयाची मंजुरी घेतली नाही. 

– अन्वय नाईक आणि त्यांच्या आईचा मृत्यू या घटनेशी आरोपींचा थेट संबध प्रस्थापित व्हायला हवा. तो पोलिसांना करता आला नाही, असे निरीक्षण न्यायायाने यावेळी नोंदवले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here