हे भन्नाट जोक्स वाचून आवरणार नाही हसू; हसा चकटफू


प्रिया फणकारतच बॉसच्या केबिन बाहेर आली,

रिसेप्शनिस्ट : का ग? काय झाल?

प्रिया: बॉस ने विचारला ” आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का?

मी म्हटल हो…… रिसेप्शनिस्ट : वॉव, मग?

प्रिया: कसलं वॉव आणि कसलं काय, हि ५० पान दिली टाइप करायला..

***************************

रजनीकांत स्वर्गाच्या दारात उभा होता,

लंच टाईम असल्यामुळे चित्रगुप्त जेवायला गेला,

 म्हणून यम स्वतः दारात उभा होता,

यमाने रजनीकांतला लगेच ओळखला,

यम : तू रोबोट चा हिरो रजनीकांत ना रे….

रजनीकांत (मस्करीत) : नाही मी टायटानिकचा हिरो लिओनार्डो डीकॅप्रिओ

यम (गोंधळून) : अरे चित्र्या, टायटानिक बुडाली होती कि जळाली होती ?

***************************


चार माणसे एका खोलीत जुगार खेळत असतात. अचानक पोलिसांची धाड पडते.

पोलीस: काय रे जुगार खेळता काय?

पहिला: सर, मी तर याला बर्थडे विश करायला आलो होतो.

दुसरा: सर, मी तर पत्ता विचारायला आलो होतो….

तिसरा: मला पाणी हवे होते प्यायला. …

चौथ्या माणसाच्या हातात पत्ते पाहून पोलीस त्याला म्हणतो.आणि तू? तू नक्कीच जुगार खेळात असणार! चौथा: हो पण कोणाशी

***************************

पेट्रोल आणि मुलींमध्ये काय समानता आहे ? ?
जेंव्हा त्यांना समजते कि आपणल्याला त्यांची खूप गरज आहे,
तेंव्हा झटकन त्यांचा भाव वाढतो 😛

***************************

रजनीकांत: लहानपणी माझ्या घरात लाईट नव्हती,
म्हणून मी”अगरबत्ती लाऊन अभ्यास केला..!
.
मक्या : हो का ? आमच्याकडे पण लोड शेडींग असायचं,
नि अगरबत्ती पण नव्हती,
मग काय माझं एक दोस्त व्हता,
‘प्रकाश’नावाचा,
त्याला सोबत बसून अभ्यास केला,.
पण पुढे तो पावसात भिजला नि विझला…

रजनीकांत: मग काय केलं?. . . . . …
.
..मक्या : काय नाय, एक मैत्रीण पण होतो….
‘ज्योती’नावाची. .. …:D :

***************************

एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली.
शिक्षक : तु आज लेट का आलीस?
मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता..
शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.
मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता…

***************************

शिक्षक : सांगा पाहू,

विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्यआहे?

हात वर करून बंड्या सांगतो : ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’

शिक्षक : काय ते?

बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले,

पण आताच काही सांगू शकत नाही.


***************************

 बाबा:- गण्या , तुला आई जास्त आवडते का मी (बाबा) ….??


गण्या :- दोघे पण .

बाबा:- नाय, दोघांपैकी एकच सांग.?

गण्या:- तरीपण दोघेच आवडतात

बाबा:- जर मी लंडनला गेलो आणि तुझी आई पॅरीसला गेली तर तु कुठे जाणार….??

गण्या:- पॅरीस

बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुला आई आवडते जास्त ..??

गण्या:- नाय, पॅरीस खुप सुँदर शहर आहे लंडनपेक्षा

बाबा:- जर मी पॅरीसला गेलो आणि तुझी आई लंडनला गेली तर मग तु कुठे जाणार …??

गण्या:- लंडनला

बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुझ आईवर जास्त प्रेम करतो

गण्या:- नाय , तस काय नाही ?

बाबा:- तर मग काय ?

गण्या:- बाबा , पॅरीस फिरुन झाल म्हणुन लंडन जाणार

बाबा:- हरामखोर , सरळ बोलना तु आईचा लाडका चमचा आहेस..!.!! :p 😀 =D


***************************

काल सांच्याला मी ज्योतिषाकडे गेलतो.
ते म्हणले की,”बाळा तु खुप शिकणार आहेस.”
मी हसायला लागलो.
ज्योतिषाला काय कळनाच झालं मग तो काय म्हणाला,”बाळा, हसतोस काय काय झालं काय?”
.
.
.
.

मी बोललो,”काका,मी खुप शिकणार हे खरंय पण पास कधी होणार ते सांगा की..”

 

***************************

चम्प्याची बायको चम्प्याला मरण्या आधी एक
लाकडी डब्बा देते.. आणि ती मरते..
चम्प्या डब्बा उघडून पाहतो तर त्यात ३००००
रुपये आणि ४ पेन भेटतात..
आणि त्यात एक चिट्ठी असते..
“चम्प्या , मला माफ
कर..मी जेंव्हा जेंव्हा तुला धोका दिला तेंव्हा मी एक
पेन या डब्ब्यात ठेवत होते..”
चम्प्या मनातल्या मनात”किती छान
बायको होती माझी..मी तिला १०-१५ वेळेस

धोका दिलाय आणि तिने फक्त ४ वेळेस”
पुढे लिहिलं असतं..
“आणि जेंव्हा १ डझन पेन
जमा झाल्या की मी त्या विकून टाकत
होते..त्याचेच हे ३००० रुपये..”

***************************

दोन व्यक्ती असतात.
एकाचं नाव असतं जो आणि दुसर्याचं असतं वो.
एकदा जो आणि वो एका जंगलात
फिरायला जातात. तिथे त्यांना एक साप दिसतो.
जो सापाला बघून खूप घाबरतो पण तेवढ्यात साप

वोला चावतो आणि वो मरतो.
आता मला सांगा, वो कसा काय मेला???
तुम्ही म्हणाल की साप चावून…पण कसं
शक्य आहे???
तो मेला कारण : जो डर गया, वो मर
गया.

***************************

मास्तर : सोन्या सांग कि चंद्रावर पहीले पाऊल कोनी टाकले .??

सोन्या : निल आर्मस्ट्राँग

मास्तर : अगदी बरोबर .. आणि दुसरे पाऊल कुनी टाकले..?

सोन्या : तेनच टाकल आसल की ते काय लंगड वाटल व्हय तुमाला ..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here