म्हणून लिंबू लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा; वाचा, काय आहे कारण

पुणे :

उत्पन्न, मागणी, कष्ट आणि शेतकऱ्यांच्या समर्थन करणारे सरकार हे समीकरण ज्या दिवशी जुळून येईल तो दिवस शेतकऱ्यांसाठी सोन्याचा असेल. मात्र ऐनकेन प्रकारे शेतकरी नेहमीच विविधमार्गे हे समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करत असतात. कांद्याबाबतही हे समीकरण जुळू शकले असते मात्र केंद्र सरकारने घेतलेल्या आडमुठ्या निर्णयाचा फटका बसला आणि हे समीकरण कोलमडले. आता पुन्हा लिंबूच्या बागेच्या माध्यमातून हे समीकरण जुळवताना शेतकरी दिसत आहेत.

उत्तरेकडील राज्यात लिंबू, संत्र्याचे उत्पादन क्षेत्र कमी असल्याने त्याभागात मागणी तुलनेने अधिक असते. सध्या ही मागणी दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात लिंबूवर्गीय फळांची मागणी देशभरात वाढत आहे. आता राजस्थान आणि भवतालच्या राज्यातही या फळांची लागवड सुरु झाली आहे. यंदा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नर्सरीमधून लिंबाच्या ४३ हजार रोपांची विक्री झाली असून त्यापैकी ११ हजार रोपे राजस्थानमधील शेतकऱ्यांनी लागवडीसाठी नेली आहेत. यावरून आपल्याला अंदाज घेणे शक्य आहे.

२०१९च्या कृषी संशोधन आणि विकास समितीच्‍या बैठकीत लिंबू रोपे संगोपनाकरिता विकसित केलेले हे तंत्रज्ञान मंजूर झाले असल्याने आता लिंबू रोप निर्मितीकडे शेतकरी व्यवसाय म्हणून पाहत आहे. ही सुद्धा एक चांगली संधी आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here