म्हणून आता पुन्हा होणार सोन्याच्या भावात वाढ; वाचा, काय आहे कारण

मुंबई :

सध्या अमेरिकेची निवडणूक जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ठरणार आहे. जगभरातील राजकीय वर्तुळासह आर्थिक जगताचे लक्ष या निवडणुकीकडे लागलेले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक घडामोडी जसे की इंधन, शेअर मार्केट, सोने-चांदीचे दर यात मोठ चढउतार जाणवत आहे. जागतिक बाजारपेठेतून सकारात्मक अंदाज आणि वातावरण दिसून आल्याने सध्या तरी शेअर मार्केट मध्ये तेजी आहे. सोन्या-चांदीचे भाव एका लिमिटपलीकडे बदलत नाहीयेत.

सध्याचे वातावरण बघता बिडेन हे आघाडीवर आहेत तर ट्रम्प पिछाडीवर आहेत. हेच निकाल भविष्य ठरल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या आर्थिक घडामोडीत अंदाज न लावण्याजोगता बदल होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यास शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळेल. याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर देखील होणार आहे. ट्रम्प यांचा पराभव झाल्यास इक्विटी बाजार कोसळण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर लोकं मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक करतील. यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

तज्ञ मंडळी गुंतवणूक करताना राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीशी संबंधित जोखीम लक्षात घेऊन गुंतवणूकदारांना सोनं खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत, असे लक्षात आले आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत कुणीही जिंकलं तरी गुंतणूकदारांना सावध राहण्याची गरज आहे, असे सांगितले जात आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here