महान तत्वज्ञानी साॅक्रेटिस यांचे हे विचार देतील जगण्याचा नवा दृष्टीकोन; नक्कीच वाचा

१) काहीही झाल तरी लग्न कराच, बायको चांगली भेटली तर आयुष्य सुखात जाईल. चांगली नाही भेटली तर तुम्ही तत्वज्ञानी बनाल.

२) महत्त्वाकांक्षा नसलेले लोक खाण्या-पिण्यासाठी जगतात आणि महत्वाकांक्षी लोक जगण्यासाठी खातात- पितात.

३) या जगात तुम्हाला सन्मानाने जगायचे असेल तर जे तुम्ही असण्याचा देखावा करता. ते प्रत्यक्षात बनुन दाखवा.

४) जास्तीत जास्त इच्छा आपल्या मनात जास्तीत जास्त व्देष निर्माण करते. (हे व्यक्तिपरत्वे बदलते)

५) जीवनात एकच चांगली गोष्ट आहे – ज्ञान, जीवनात एकच वाईट गोष्ट आहे – अज्ञान.

६) तुम्ही जर तुमच्या जवळ असलेल्या वस्तूबद्दल संतुष्ट नसाल. तर भविष्यात मिळणाऱ्या वस्तूबद्दल सुद्धा तुम्ही संतुष्ट नसाल.

७) जो माणूस कमीत कमी गोष्टीत संतुष्ट राहतो. तो खरा श्रीमंत माणूस आहे.

८) बुद्धिमान व्यक्ती कल्पने विषयी बोलतो. साधारण व्यक्ती घटने विषयी बोलतो आणि बुद्धिहिन व्यक्ती माणसांविषयी बोलतो.

९) ज्या गोष्टींमुळे तुम्हाला राग येतो. ती गोष्ट दुसर्‍यावर वापरु नका.

१०) सर्वात उत्कृष्ट मानवी वरदान म्हणजे मृत्यू .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here