चहा पिताना नेहमीच टाळा ‘या’ गोष्टी; अन्यथा होईल आरोग्यावर होतील ‘हे’ परिणाम

मुळात चहा हे विषच आहे, जे आपण हळूहळू घेत असतो. चहा आपण रोजच पितो त्यामुळे चहाविषयी तुम्ही काय वेगळं सांगणार हा प्रश्न पडलाच असेल. चहा बनवताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. अन्यथा चुकीच्या पद्धतीने बनवलेल्या चहाचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. या दिसायला छोट्या असणाऱ्या चुकासुद्धा शरीरासाठी त्रासदायी ठरतात. चहा पिताना कोणत्या चुका टाळाव्यात ते जाणून घेवूयात.

१) रिकाम्या पोटी कधीच चहा पिऊ नये कारण रिकाम्यापोटी चहा घेतल्यास अ‍ॅसिडिटी, कॅन्सरसारखे आजार जडण्याची शक्यता असते.

२) चहा उकळवत असताना तो जास्त उकळला जाणार नाही, याकडे लक्ष असावे. कारण जास्त वेळ उकळवलेला चहा प्यायल्याने अ‍ॅसिडिटीची समस्या होऊ शकते.

३) काळी मिरी, सुंठ, तुळस, लवंग, जायफळ काहीजण चहामध्ये टाकतात. पण यात असणाऱ्या कॅफेनमुळे या पदार्थांमधील गुणधर्म चहामध्ये योग्य प्रमाणात उतरत नाहीत.

४) जेवण झालं की चहा पिण्याची अनेकांना सवय असते. जेवल्यानंतर लगेच चहा प्यायल्याने जेवणातील पोषक घटक शरीरापर्यंत पोहचत नाही.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here