अर्णब गोस्वामी यांना ‘त्यांनी’ खडसावलं, ‘नीट उभे राहा, हातवारे करू नका’

अलिबाग :

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात थेट सूसाईड नोटमध्ये नाव असणाऱ्या ‘रिपब्लिक टीव्ही’च्या अर्णब गोस्वामी यांना काल सकाळी अटक करण्यात आली. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात स्वतःचा न्यायाधीश असल्यासारखी वक्तव्ये करत थेट स्टुडीओत बसून न्यायदानाची भूमिका बजावणाऱ्या ‘रिपब्लिक टीव्ही’च्या अर्णब यांना  मुंबईतून अटक करून आणल्यानंतर रायगड पोलिसांनी त्यांना जवळपास 1 वाजता अलिबाग न्यायालयासमोर सादर केलं. त्यावेळी कोर्टात गेल्यावर ते काही हातवारे, तसंच इशारे करत होते. यावरून न्यायालयाने त्यांना खडसावत सांगितले की, ‘नीट उभे राहा, हातवारे करू नका.

कोर्टानं कागदपत्रांअंती नोंदवलं निरीक्षणानुसार अर्णब गोस्वामी आणि इतरांना केलेली अटक अवैध होती. कारण अन्वय नाईक आणि त्यांच्या आईचा मृत्यू याचा आणि या तीन आरोपींचा काय संबंध आहे, हा संबंध देखील रायगड पोलीस समजून सांगू शकले नाही किंवा पुरावे देऊ शकले नाहीत. पोलिसांना अर्णब गोस्वामी आणि इतर आरोपींची पोलीस कोठडी का पाहिजे, याच्यासाठी कोणताही सबळ पुरावा कोर्टासमोर सादर केला नाही.

अर्णब गोस्वामी आणि इतर आरोपींचा अन्वय नाईक आणि त्यांच्या आईचा मृत्यू यांच्याशी असलेला संबंधही चौकशी अधिकाऱ्यांना प्रस्थापित करता आलेला नाही. याशिवाय जी काही चौकशी झाली ती आरोपी बाहेर असतानाच झाली आहे, त्यामुळे आता त्या आरोपींची कोठडीत पुन्हा चौकशी करण्याची गरज नाही, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. आता तिन्ही आरोपींनी न्यायालयासमोर जामीन अर्ज सादर केले आहेत आणि जामिनासाठी विनंती केली आहे, अशी माहिती आरोपींचे वकील सुशील पाटील यांनी बीबीसी मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. 

 संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here