राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच! एकनाथ खडसेंसह ‘या’ 5 माजी आमदारांनी केलाय प्रवेश

मुंबई :

गेल्या २ महिन्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं आहे. एका माजी आमदारांनी तर राष्ट्रवादीतून शेकापमध्ये मग ऐनवेळी भाजपमध्ये, तिथेही खटका जुळला नाही म्हणून काँग्रेसचा हात धरला आणि आता अखेर वेळ साधत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आता हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादी आणखी मजबूत होणार आहे. तेथील जनसुराज्य पक्षाचे नेते आणि माजी आमदार राजीव आवळे हे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

एकनाथ खडसे यांच्या निमित्ताने जवळपास ५ माजी आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे यातील एक माजी आमदार कॉंग्रेसचे आहेत. भाजपमधून नाराज असलेल्या एकनाथ खडसे (मुक्ताईनगर, जळगाव), उदेसिंग पाडवी (शहादा, नंदुरबार), काँग्रेसमधून सदाशिव पाटील (खानापूर आटपाडी, सांगली), सीताराम घनदाट (घनदाट मामा) (गंगाखेड, परभणी) हे अपक्ष तर रमेश कदम (चिपळूण, रत्नागिरी) यांनी राष्ट्रवादी-शेकाप-भाजप-काँग्रेस –राष्ट्रवादी अशी घरवापसी केली आहे.

दिवसेंदिवस महाविकास आघाडीत आणि प्रामुख्याने राष्ट्रवादीत माजी आमदारांनी तसेच विविध तालुक्यात मोठे उपद्रव मूल्य असलेल्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. शिवसेनेमध्येही प्रवेश वाढलेले आहेत. एकूण या सगळ्या घोळत कॉंग्रेस नेहमीप्रमाणे थंड आहे. भाजपला रोखणे हा एकमेव अजेंडा सध्या कॉंग्रेस राबवत असली तरीसुद्धा त्या नादात आपला व्याप वाढवण्याचे कॉंग्रेसकडून कुठलेही काम मोठ्या प्रमाणावर सुरु नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here