नाश्ताच्या वेळी ‘या’ 4 चूका करणं करेल आरोग्यावर गंभीर परिणाम

नाश्ता करताना आपण पोहे, उपमा, मेदू वडा, शाबूदाणा वडा असे पदार्थ खात असतो. होस्टेलवर राहणारे विद्यार्थी किंवा मोठ्या शहरात कामासाठी राहणारे अनेक सिंगल लोकही नाश्त्यात सर्रास मेदू वडा( २ नग ३२५ कॅलरीज), साबूदाणा वडा( ४ नग १६० कॅलरीज), वडापाव(३०० कॅलरीज), मिसळपाव(२९८ कॅलरीज), फाफडा(एक छोटा कम ८७ कॅलरीज), पुरीभाजी(३५० कॅलरीज) असे पदार्थ खात असतात. या पदार्थांमुळे शरीरातील कॅलरीज तर वाढतातच परंतु असे जड पदार्थ खाण्यामुळे तुम्हाला दिवसभर अॅसिडिटी होऊन आळश्यासारखे वाटू लागते. नाश्ता करताना या चुका नक्कीच टाळा :-

१)     अनेक लोकं नाश्तामध्ये कार्ब्स आणि प्रोटीन घटकांचा समावेश करत नाहीत, परिणामी फॅट्स वाढतात. योग्य नाश्त्यामुळे शरीरात उर्जा टिकून राहण्यास मदत होते. रक्तातील साखरही नियंत्रणात राहते. 

२)      नाश्ता टाळल्यास त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. यामुळे मेटॅबॉलिझमचं कार्य बिघडतं. सोबतच यामुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणात चढउतार होण्याची शक्यता असते. 

३)     तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आहारातून कॅलरीज कमी करण्याचा विचार करता. त्यामुळे नाश्ता करताना फक्त एक उकडलेले अंडे किंवा एक कप कॉफी घेतली तर तुम्हाला दिवसभर भुक लागत रहाते. त्यामुळे दिवसभर पोट भरलेले रहावे यासाठी भरपेट नास्ता करा. त्यामुळे तुम्ही दिवसभरात इतर स्नॅक्स कमी खाल व तुमचे वजन कमी होऊ शकेल.

४)     पॅक फ्रूट ज्युस मध्ये साखर,सायट्रीक अॅसिड व केमिकल्स असतात ज्यामुळे ते दीर्घकाळ टिकतात.त्यामुळे पॅकींगवर ऑल नॅचरल अथवा शुगर फ्री लिहिलेल्या फळांच्या रसामुळे देखील तुमच्या कॅलरीज वाढू शकतात.त्यामुळे फळांच्या रसाऐवजी अख्खे फळ खाणे नेहमीच योग्य असू शकते.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here