कोरोना काळात 65 कोटीपेक्षा जास्त भारतीयांनी घेतलं कर्ज; महाराष्ट्रातील ‘हे’ शहर आघाडीवर

मुंबई :

कोरोनाचा काळ सर्वांसाठीच हा मोठ्या आर्थिक संकटाचा होता. याच काळात मोठमोठे उद्योगपतीसुद्धा दिवाळखोर ठरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता कुठेतरी परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याची चित्र आहे. मात्र अद्यापही आपण कोरोनाकाळात आलेल्या संकटातून सावरू शकलेलो नाहीत. त्या काळात अनेक लोकांनी विविध कारणांनी कर्ज घेतलं. एवढच नाहीतर घर चालवण्यासाठी सुद्धा अनेकांनी कर्ज घेतल्याचे  होम क्रेडिट इंडियाच्या संशोधनात समोर आले आहे.

लॉकडाऊन लागला त्यानंतरच्या पहिल्या महिन्यात तब्बल १२ कोटी लोकांनी आपला रोजगार गमावला होता. त्यामुळे घर चालणार कसं? दैनदिन गरजा भागणार कशा? असे अनेक प्रश्न बेरोजगार असलेल्या कुटुंबासमोर होते. या दरम्यान सर्वच उद्योगही संकटात सापडले होते. त्यामुळे भारताय लॉकडाऊन काळात 65 कोटीपेक्षा जास्त लोकांनी कर्ज घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे.

तब्बल 46 टक्के भारतीयांनी आपलं घर चालवण्यासाठी, प्रत्येक चार पैकी एकाने मित्रांकडून / कुटुंबाकडून दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कर्ज घेतलं आहे. 27 टक्के लोकांनी ईएमआय भरण्यासाठी कर्ज घेतलं असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर यातल्या 14 टक्के लोकांना लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने कर्ज घेण्याची वेळ आली होती. या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि भोपाळमध्ये सगळ्यात जास्त 27 टक्के लोकांनी कर्ज घेतलं आहे. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here