पनीर खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे; नक्कीच वाचा

हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यावर शाकाहारी लोक पनीरच्या भाज्या खाण्यास प्राधान्य देतात. आपल्यापैकी अनेक लोक दैनंदिन जीवनात पनीर खात असतात. दुधापासून तयार करण्यात आलेल पनीर अत्यंत पौष्टिक तर असतेच तसेच पनीरमध्ये फॅट्स सुद्धा असतात. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. पनीरमध्ये कॅल्शियम,फॉस्फरस, पोटॅशियम आणि झिंक सुद्धा मोठ्या प्रमाणात असतं. पनीर सेवन करणे सर्वांसाठी आरोग्यदायी आहे. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत पनीर खाण्याचे फायदे :-

  • – 100 ग्रॅम पनीरमधून 18 ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. यामुळे स्नायू बळकट होतात आणि वजन कमी होण्यासही मदत होते.
  • – रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. 
  • – दात व हाडे मजबूत होण्यास मदत होते.
  • – कॅन्सर, हृदय विकार यांसारख्या गंभीर आजारांपासूनही पनीरमुळे संरक्षण होते. 
  • – कष्टाची कामे करणाऱ्या लोकांनी पनीर खाल्ल्यास त्यातील कॅलरी सहज बर्न होऊन त्यांना पोषक घटक मिळू शकतात म्हणून पनीर प्रमाणात खावे, अतिजास्त खाऊ नये किंवा खाणे टाळूही नये.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here