आक्रमक झालेल्या ‘या’ कॉंग्रेस नेत्याचा सवाल; आता संध्याकाळी चॅनलवर भोकणार कोण?

मुंबई :

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात थेट सूसाईड नोटमध्ये नाव असणाऱ्या ‘रिपब्लिक टीव्ही’च्या अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. यावरून आक्रमक झालेले कॉंग्रेस नेते भाई जगताप यांनी ‘आता संध्याकाळी चॅनलवर भोकणार कोण?’, असा सवाल नाव न घेता उपस्थित करत अर्नबला टोला हाणला आहे.

दरम्यान सकाळी भाई जगताप यांनी ‘गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला सोडणार नाही हे महाराष्ट्र सरकारने सिद्ध केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन’, असे ट्वीटही केले होते.

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात स्वतःचा न्यायाधीश असल्यासारखी वक्तव्ये करत थेट स्टुडीओत बसून न्यायदानाची भूमिका बजावणाऱ्या ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना आपलेही नाव एका आत्महत्या प्रकरणात गुंतले होते, याचा विसर पडला होता.

२०१८ ची अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची केस ओपन झाली आणि अर्नबला अटक करण्यात आली आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणात अर्नब यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिसांना आव्हान दिले होते. कुठलेही पुरावे नसताना या प्रकरणावर आघाव भाष्य अर्नब सातत्याने करत होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी टीआरपी घोटाळ्यामुळेही अर्नब आणि त्यांचा माध्यमसमूह चर्चेत आला होता.     

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here