अशी बनवा स्वादिष्ट आणि चवदार ‘बाकरवडी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा

बाकरवडी हा पदार्थ खायला अप्रतिम चवदार असतो. हा पदार्थ शक्यतो आपण हॉटेल किंवा स्वीटहोममधूनच मागवतो. मात्र आज आम्ही आपल्याला याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा..

साहित्य घ्या मंडळीहो…

आवरणासाठी :-

 1. 250 ग्रॅम मैदा
 2. 3 टेबलस्पून बेसन
 3. 3 टेबलस्पून तेल
 4. आवश्यकते नुसार पाणी

सारणासाठी :-

 • 3 टेबलस्पून सुके खोबरे
 • 1 टेबलस्पून मिरची पावडर
 • 1/2 टीस्पून हळद
 • 2 टेबलस्पून धणे जिरे पावडर
 • 1 टीस्पून खसखस
 • 1/2 टीस्पून बडीशेप
 • 1 टीस्पून तिळ
 • 1/2 टीस्पून गरम मसाला
 • 4-5 टेबलस्पून बारीक शेव
 • 1/2 टीस्पून साखर
 • आवश्यकतेनुसार मीठ

हे साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला…

 1. सर्व प्रथम आपण आवरणासाठी पीठ तयार करून घेऊ. एका परातीत मैदा बेसन मीठ घेवून त्यात 3 टेबलस्पून तेल गरम करून घालावे.
 2. मिक्स करून त्यात आता आवश्यकतेनुसार पाणी घालून चपातीसाठी जस पीठ मळून घेतो तसे मळून बाजूला ठेवू.
 3. आता सारण बनवून घेण्यासाठी सुके खोबरे थोडे भाजून घ्यावे. त्याच प्रमाणे तिळ, खसखस आणि बडीशेप भाजून घ्यावी. आता मिक्सरमधे सुके खोबरे, तिळ, बडीशेप, खसखस, मसाला, गरम मसाला, हळद, धणे जिरे पावडर, मीठ, थोडा बारीक शेव आणि साखर घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.
 4. तयार झालेला सारण एका भांड्यात काढून घ्या.
 5. मळून ठेवलेल्या पीठाचे चार गोळे करा. एका गोळ्याचा मोठी पती लाटून घ्या. त्यावर चिंच गूळ घेतलेली चटणी पसरवा. आता त्यावर तयार मसाला सारण पसरवा. आता त्यावर थोडा शेव भुरभुरून लाटणीच्या सहाय्याने त्याला प्रेस करून घेवू.
 6. आता पोळी गुंडाळून घेवू. आवश्यक वाटल्यास कडांना पाणी लावू शकता. घट्ट गुंडाळून घ्यावे. आता सुरीने कापून घेवुन थोडा दाबून घ्यावे. असे सर्व गोळ्यांचे बाकरवडी करून घ्यावी.
 7. सर्व बाकरवडी तयार झाल्यावर. एका कढईत तेल गरम करून मंद आचेवर तळून घ्यावे. तयार झाली आपली खुसखुशीत बाकरवडी.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here