असे बनवा लज्जतदार तवा चिकन; रेसिपी वाचा एका क्लिकवर

चिकन म्हटलं की नॉनव्हेजप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटतं. मात्र नेहमी चिकनचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा तवा चिकन पदार्थ नक्कीच ट्राय करा. बनवायलाही सोपा आहे. महत्वाचे म्हणजे कमी साहित्यात व कमी वेळात ही रेसिपी होते. चवीला तर खूप भन्नाट होते. तांदळाची भाकरी व तवा चिकन हे एकत्र खाणे तर स्वर्ग आहे मंडळी…

साहित्य घ्या मंडळीहो…

 1. 1/2 किलो चिकन
 2. 2 मोठे कांदे
 3. 1 टोमॅटो
 4. 2 टीस्पून आलं लसुण पेस्ट
 5. 5-6 लाल सुक्या मिरच्या
 6. 1 हिरवी वेलची
 7. 2 स्टारफुल
 8. 5-6 लवंग
 9. 6-7 काळमिरी
 10. 1 दालचिनी चा तुकडा
 11. 2 टीस्पून धने
 12. 1 टीस्पून जिरे
 13. चवीनुसार मिठ
 14. 2 टीस्पून तेल
 15. 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर

हे साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला…

प्रथम सगळे खडे गरम मसाले भाजून घ्या. जास्त भाजल्यास मसाला कडवट होऊ शकतो म्हणून खूप भाजू नका. 2-३ मिनिट भाजावे. थंड झाले की मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.

आता कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या. एका तव्यावर तेल गरम करून कांदा टोमॅटो २-३ मिनिट भाजून घ्यावा.

आता चिकन स्वच्छ धुवून त्यातले पाणी निथळून घ्या व चिकन तव्यावर टाकून १० मिनिट परतवून घ्या. आता त्यात बारीक केलेला मसाला, आलं लसूण पेस्ट व मीठ घालून पुन्हा १० मिनिट परतवून घ्या

आता चिकन शिजलं का ते चेक करा नाहीतर अजून थोडावेळ शिजवा. वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करा.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here