‘ही’ टीव्ही खरेदी करून ओटीटी प्लॅटफॉर्म्स मिळवा ऑफरमध्ये..!

मुंबई : 

सध्या जिथे इंटरनेट सेवा उत्तम आहे अशा सर्व ठिकाणी आणि नवीन काहीतरी पाहण्याची आस असलेल्यांना ओटीटी प्लॅटफॉर्म खुणावत आहे. आता अनेक सिनेमे यावर प्रसिद्ध होत आहेत. अशावेळी टीसीएल कंपनीने आपल्या नवीन टीव्ही ग्राहकांना असे प्लॅटफॉर्म घेण्यासाठी ऑफर देण्याची नवी ऑफर आणली आहे.

टीसीएलने कंपनीच्या यूआय टीसीएल चॅनेल कंटेंट पॅकेजवर ५० टक्के सवलत देण्याच्या उद्देशाने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केलेली आहे. ग्राहकांना टीसीएल अँड्रॉइड टीव्हीच्या टीसीएल चॅनलवर ग्राहकांना या सर्व ऑफर्स मिळतील.

इरॉस नाऊच्या वार्षिक पॅकवर ५० टक्के, झी फाइव्हच्या पॅकवर २५ टक्के , डॉक्युबेच्या हंगामी आणि वार्षिक पॅकवर ४० टक्के, एपिक ऑनच्या सर्व पॅकवर २५ टक्के, सोनीलिव्हच्या वार्षिक पॅकवर १० टक्के सवलत यामुळे ग्राहकांना मिळणार आहे.

टीसीएलचे वरिष्ठ विपणन व्यवस्थापक विजय मिक्किलीनेनी यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, सणासुदीचा हंगाम विक्रीसह ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचादेखील आहे. उत्कृष्ट तंत्रज्ञान प्रदान करण्यावर कंपनी विश्वास ठेवते. सोबतच कंटेंट प्लॅटफॉर्मचे महत्त्वही जाणून असल्याने यंदाच्या सणासुदीत कंपनीने ही भेटवस्तू आणली आहे. कंपनीचा अँड्रॉइड टीव्ही सुरु केल्यावर ग्राहकांना प्रत्येक क्षणाचा आनंद घेता यावा, याची हमी याद्वारे देण्याचा प्रयत्न आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here