ठाकरे सरकारकडून ‘अनलॉक’ची नवी नियमावली जारी; वाचा, काय होणार चालू

मुंबई :

कोरोना अद्यापही विशेष आटोक्यात आला नसला तरी काही अंशी नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. तसेच आरोग्य, कायदा सुव्यवस्था व इतर यंत्रणांनी चांगली कामगिरी केल्यामुळे तसेच लोकही काळजी घेताना दिसत असल्याने आता टप्प्याटप्प्याने सर्वच खुले होत आहे. गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं बंद होती. आता नाट्यगृहं, सिनेमागृहं, मल्टिप्लेक्सेस ५० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून देण्यात आलेले सर्व नियम बंधनकारक करत सरकारने राज्य सरकारनं अनलॉक संदर्भात नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे. 

वाचा नियमावली थोडक्यात आणि मुद्देसूद :-

१) नाट्यगृहं, सिनेमागृहं, मल्टिप्लेक्सेस ५० टक्के क्षमतेनं सुरू ( खाद्यपदार्थ नेण्यास मनाई)

२) बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश या इनडोअर खेळांसह इनडोअर शूटिंग रेंज सुरू 

३) आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सरावासाठी जलतरण तलाव सुरू

४) कंटेन्मेंट झोनमधील जलतरण तलाव बंदच.

५) कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असणारी योगा अभ्यास केंद्रं सुरू 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here