कपडे धुण्याबद्दल ‘ही’ माहिती आहे का तुम्हाला; वाचा रंजक आणि रोचक माहितीचा खजिना

कपडे धुणे हे फ़क़्त महिलांचे काम आहे असे म्हणण्याचा काळ आता संपला आहे. कारण, आता हेच काम पुरुषही महिलांच्या खांद्याला खांदा लावून करतात. तसेच वॉशिंग मशीन नावाचे धुलाईयंत्र आल्याने हे काम तर आता आणखी सुकर झालेले आहे. आज आपण याच धुलाई करण्याच्या कामाचा रंजक इतिहास पाहणार आहोत. मग आहात ना तयार रोचक महिती वाचायला?

तर, मित्र-मैत्रिणींनो, कपडे धुण्याच्या कामाची पद्धत नेमकी कधी सुरू झाली हे काही माहित नाही. मात्र, असे म्हटले जाते की, सुमारे ३ ते ४ हजार वर्षांपूर्वी इटलीतील पाँपेई येथील इतिहासात कपडे धुण्याच्या बाततीत असलेली माहिती सापडते. हीच कपडे धुण्याचा बाबतची सर्वात जुनी नोंद आहे. त्यावेळी स्थानिक गुलाम मोठ्या मातीच्या भांड्यात अनवाणी पायांनी तुडवून कपडे धूत असल्याचे उल्लेख आहेत. म्हणजे येथूनच कपडे धुवून घालण्याची प्रथा आणि परंपरा सुरू झाली असेच आपण समजूया. रोमन काळात कपडे धुण्याचा धंदा सुरू असल्याच्या नोंदी आहेत. त्यावेळी त्यांनी असा व्यवसाय करताना खराब झालेल्या व हरवलेल्या कपड्यांबद्दलची भरपाई कशी असावी याचाही कायदा केला होता. त्यावेळी रोमन जनता मुलतानी माती, पोटॅश क्षार (अल्कली) इत्यादींचा उपयोग कपडे धुण्यासाठी करीत होती. तर, नंतर गॉल लोकांनी साबणाचा शोध लावल्याची नोंद सापडते. तरीही इसवी सणाच्या पहिल्या शतकापर्यंत रोमन किंवा ब्रिटीशही कपडे धुण्यासाठी साबणाचा वापर करीत नव्हते. कारण, साबण महाग पडत असल्याने मूलतानी माती, अमोनिया, पोटॅश व सोडाक्षार यांच्याच मिश्रणाचा ते उपयोग करीत असत.

अशा पद्धतीने माणूस जंगलातून घरात राहायला आणि मग त्याला स्वच्छतेचे महत्वही पटायला लागले. कारण, एकाच ठिकाणी राहिल्याने आणि एकाच पद्धतीचे कपडे परिधान केल्याने अंगाची येणारी दुर्गंधी आणि त्यामुळे निर्माण होणारे आजार यामुळे ही आंतरिक उर्मी मानवामध्ये निर्माण झालेली असावी. आपण भारताचा जर विचार केला तर आपल्याकडे फेस होणारे बेलफळाचा गर असे वनस्पतिजन्य पदार्थाचे अर्क, वनस्पतींच्या राखेपासून मिळणारे पदार्थ यांचा वापरही कपडे धुण्यासाठी होत होता. उदासीन अशी क्षारीय माती, टाकणखार, ट्रोना (सोडियम सेस्किकार्बोनेट, नेट्रॉन) आणि पोटॅशियम कार्बोनेट या पदार्थांचाही भारतात कपडे धुण्यासाठी वापर करीत असल्याच्या नोंदी सापडतात. सुश्रुत व चरक यांच्या संहितामध्ये राखेपासून दाहकीकरणाने दाहक अर्थात कॉस्टिक सोडा तयार करण्याची पद्धत कशी असते हेही सांगितले आहे.

अशा पद्धतीने अनेक नोंदी आणि परंपरा कपडे धुण्याच्या बाबतीत सापडतात. मराठी विश्वकोश यामध्येही याची माहिती आता देण्यात आलेली आहे. कपडे धुतात म्हणजे काय करतात आणि कशा पद्धतीने ही प्रक्रिया केली जाते त्यानुसार याचे प्रकार पडतातयातील पहिली पद्धत म्हणजे परंपरागत पद्धतीने म्हणजे हातधुलाईने कपडे धुणे होय. तर, वॉशिंग मशीन वापरून यांत्रिक पद्धतीने आणि काही विशिष्ट प्रकारच्या कपड्यांसाठी वापरण्यात येणारी निर्जल धुलाई पद्धत अशाही पद्धती आहेत. धुलाई करण्यामध्ये डाग घालविणे, रफू करणे, खळ देणे आणि दुरुस्ती करणे असे तीन घटकही येतात. आपण लाँड्रीमध्ये गेलो तर अजूनही या सर्व क्रिया केल्या जात असल्याचे आपण पाहतोच की.

अशा पद्धतीने कपडे धुण्याच्या सध्या घटकाचा विकास आणि त्यामध्ये झालेले बदल यांची ही माहिती आहे. आपण पहा की कशा पद्धतीने मानवाच्या राहणीमानात सकारात्मक बदल होत गेलेले आहेत. आरोग्यदायी जीवनपद्धतीची गरज मानवाला समजल्याने हे महत्वपूर्ण असे बदल होत गेलेले आहेत. मात्र, तरीही काही माणसांमध्ये अजूनही स्वच्छतेच्या प्रती विशेष आस्था निर्माण झालेली नाही. अगदी आता करोना विषाणूची जीवघेणी साथ आलेली असतानाही काहींना स्वच्छता आणि निरोगी जीवनाचे सर समजेले नाही. अशी मंडळी अजूनही पौराणिक कालखंडात जगात तर नाहीत न अशीही शंका त्यामुळेच येते.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here