गुगलने ‘हा’ सल्ला देत दिला धोक्याचा इशारा; क्रोमबाबत घडलाय ‘हा’ प्रकार

दिल्ली :

गुगल सातत्याने आपल्याकडे असणारे अनेक अ‍ॅप अपडेट करत असते. आपल्याकडे बहुतांश लोक अँड्रॉईडचे वापरकर्ते आहेत. आणि अँड्रॉईडला गुगलचे अ‍ॅप जोडलेले आहेत. असेच जास्त वापरले जाणारे क्रोम अ‍ॅपमध्ये मोठा बग सापडला आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलमधील महत्वाची माहिती चोरी होऊ शकते. तुमच्या प्रायव्हसीला धोका असल्याने तसेच तुमचा मोबाईल हॅक होण्याची शक्यता आहे, असा इशारा गुगलने दिला आहे.

तसेच क्रोम हे अ‍ॅप तातडीने अपडेट करावे, असा महत्वाचा सल्लाही गुगलने दिला आहे. ‘क्रोम ब्राऊझरमध्ये असलेल्या बगच्या वापरातून युजरला नुकसान केले जाऊ शकते, अशी माहिती गुगलने दिली आहे तर हॅकर्सना क्रोम सिक्युरिटी सँडबॉक्स बायपास करण्याचा पर्याय मिळाला होता. असे केल्य़ास हॅकर्स युजरच्या मोबाईलमध्ये त्याच्या नकळत त्यांचे विद्रोही कोड रन करू शकत होते. तसेच अन्य अनेक बदलही करू शकत होते, अशी माहिती ZDNet ने आपल्या रिपोर्टमध्ये नोंदवली आहे.

क्रोम फॉर अँड्रॉईड ब्राऊझरसाठी सिक्युरिटी अपडेट रिलिज करण्यात आली आहे. क्रोमचे नवीन व्हर्जन 86.0.4240.185 रिलीज करण्यात आले आहे. यामध्ये CVE-2020-16010 बग फिक्स करण्यात आला आहे, अशीही माहिती गुगलने दिली.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here