आम्ही पोपट पाळत नाही पोपट ‘तेच’ पाळतात; ‘या’ भाजपच्या बड्या नेत्याचा पलटवार

मुंबई :

एका मराठी महिलेचं कुंकू पुसलं गेलं, त्याला वाचवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपाच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलं आहे, त्यांच्यात त्यांचा जीव अडकला आहे का?, असा सवाल शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपस्थित केला. यावरून ‘अर्णब गोस्वामी हा आमचा पोपट नाही. आम्ही पोपट पाळत नाही. पोपट पाळण्याची सवय शिवसेनेलाच आहे’, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

अर्णब गोस्वामींच्या अटकेवरुन शिवसेना आणि भाजपा यांच्या शाब्दिक युद्ध रंगलं आहे. टीआरपी घोटाळ्यामुळे चर्चेत असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णव गोस्वामी याना २०१८ मध्ये घडलेल्या एका घटनेमुळे राहत्या घरातून सकाळी आठच्या सुमारास अटक करण्यात आली. यानंतर राज्यातील भाजप नेत्यांसह थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना परब म्हणाले की, एका खुनी माणसाला वाचवायचं काम भाजपा करत आहे. गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं तर महाराष्ट्र आणीबाणीकडे चालला म्हणून ओरडायचं. सुसाईड नोटमध्ये अर्णब यांचं नाव होतं‌, नाईक‌ कुटुंबीय कोर्टात गेले होते, त्यानंतर‌ त्यांना तपासाची ‌परवानगी दिली.

 एका मराठी महिलेचं कुंकू पुसलं गेलं, त्याला वाचवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपाच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलं आहे, त्यांच्यात त्यांचा जीव अडकला आहे का?, असा सवालही यावेळी परब यांनी उपस्थित केला आहे.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here