भाजपाच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलं आहे; भाजपला आहे ‘ती’ भीती

मुंबई :

टीआरपी घोटाळ्यामुळे चर्चेत असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णव गोस्वामी याना २०१८ मध्ये घडलेल्या एका घटनेमुळे राहत्या घरातून सकाळी आठच्या सुमारास अटक करण्यात आल्याचे समजते. त्यांना मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे झोड उठवली. दरम्यान या टीकेचे प्रत्युत्तर देताना ‘अर्णब गोस्वामीच्या अटकेचा माध्यम स्वातंत्र्याशी काही संबंध नाही’ अशी माहिती शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

याविषयी पुढे बोलताना ते म्हणाले की, . एका खुनी माणसाला वाचवायचं काम भाजपा करत आहे. गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं तर महाराष्ट्र आणीबाणीकडे चालला म्हणून ओरडायचं. सुसाईड नोटमध्ये अर्णब यांचं नाव होतं‌, नाईक‌ कुटुंबीय कोर्टात गेले होते, त्यानंतर‌ त्यांना तपासाची ‌परवानगी दिली.

यावेळी ‘महाविकासआघाडीबाबत एवढी लोकं बोलतं आहेत, पण त्यांना आम्ही आत टाकत नाही. अर्णब यांच्या तोंडातून काही नावं बाहेर पडतील अशी भाजपला भिती आहे’, असेही पुढे बोलताना परब यांनी स्पष्ट केले.

एका मराठी महिलेचं कुंकू पुसलं गेलं, त्याला वाचवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपाच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलं आहे, त्यांच्यात त्यांचा जीव अडकला आहे का? , असा सवालही यावेळी परब यांनी उपस्थित केला आहे.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here