मुंबई शेअर बाजारात मोठी उसळी; गुंतवणूकदारांना मिळाला ‘एवढ्या’ लाख कोटींचा फायदा

मुंबई :

गेल्या २ दिवसांपासून शेअर बाजारातील अंदाज बंधने कठीण झाले आहे. विविध घटनांचे परिणाम शेअर बाजारावर जाणवत आहेत. मोठमोठ्या कंपन्यांच्या तिमाहीत झालेली घट तसेच विविध निवडणुकांचे परिणाम आर्थिक जगतावर दिसत आहेत. आज मात्र जागतिक बाजारपेठेतून सकारात्मक अंदाज आणि वातावरण दिसून आल्याने मिळाल्यामुळे मुंबई शेअर बाजारानं उसळी घेतली आहे.

आयटी आणि फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली असून इन्फोसिस आणि सन फार्मा या कंपन्यांचे शेअर्स चांगलेच वधारले आहेत. अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय आर्थिक जगतात चांगले संकेत मिळाले आहेत. बाजार उघडताच सेन्सेक्सने 399 अंकांची वाढ नोंदविली, तर निफ्टी 100 अंकांनी वधारला. काल म्हणजेच मंगळवारी मंगळवारी मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध एकूण कंपन्यांची मार्केट कॅप 1,58,33,666.01 कोटी रुपये होते, जे बुधवारी 1,22,403.08 कोटी रुपयांनी वाढून 1,59,56,069.09 कोटी रुपयांवर गेले आहे.

बाजारात सेन्सेक्समध्ये 21 शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे, तर 9 शेअर्स घसरले. बुधवारी बाजारात गुंतवणूकदारांना 1 लाख कोटींपेक्षा जास्त फायदा झाला. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी जागतिक बाजारपेठांमध्ये सकारात्मक कल दिसत आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here