कविता माझी-तुझी | आईविषयी ही सुंदर कविता नक्कीच वाचा

जिला शब्दांत मांडता येत नाही,
अशी व्यक्ती म्हणजे आई.।

जिचे उपकार कधीच फेडता येत नाही,
अशी व्यक्ती म्हणजे आई.।

जिचे कष्ट मोजण्याचं कुठलही माप नाही,
अशी व्यक्ती म्हणजे आई.।

जिच्या कुशीत गेल्यावर आजही सारं दु:ख विसरतं,
अशी व्यक्ती म्हणजे आई.।

खरचं जिचं वर्णन कशातचं होवू शकत नाही,
अशी व्यक्ती म्हणजे आई.।

निशिकांत कुलकर्णी
९१७५८५७९४७
नांदेड

(नमस्कार मंडळीहो, लॉकडाऊन दरम्यान आपण कविता माझी- तुझी उपक्रम काही दिवसांसाठी वेबसाईटला आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे थांबवला होता. आता आपण पुन्हा नव्याने हा उपक्रम सुरु करत आहोत. निशिकांत कुलकर्णी यांच्या आईविषयीच्या सुंदर कवितेला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले आहे. कविता माझी तुझीच्या प्रथम पर्वातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमाकांवर असणाऱ्या कवींची नावे तसेच उत्तेजनार्थ असणाऱ्या कवींची नावे ८ नोव्हेंबरला जाहीर केली जातील.)

ता. क. : तुमच्या कथा आणि कवितांना आम्ही देऊ आमच्या पोर्टलवर प्रसिद्धी आणि महिनाभरात सर्वाधिक वाचनीय ट्रेंडमध्ये राहिलेल्या कवी व लेखकांना आम्ही देऊ खास बक्षीस.

कविता पाठवण्यासाठी संपर्क :

विनोदकुमार सुर्यवंशी (कार्यकारी संपादक, कृषीरंग)

मो. 7875200902 (व्हाटस्अॅप)

Email : Suryvinod9@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here