अर्णवप्रकरणी लोकशाहीची हत्या; महाजनांनी पत्रकारांवर केला गंभीर आरोप

रिपब्लिक टीव्हीचे सर्वेसर्वा आणि आपल्या वेगळ्या स्टाईलने टीव्हीवर आवाज वाढवत बोलण्याच्या पद्धतीमुळे प्रसिद्ध असलेल्या अर्णव गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यावर भाजपने ही राजकीय स्वरुपाची अटक असल्याचे म्हटले आहे. तर मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांनी हे कायदेशीर असून त्यात पत्रकारितेचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. तर, भाजप नेते गिरीश महाजन यांनी सरकारवर यानिमित्ताने टीका केली आहे.

त्यांनी फेसबुकवर म्हटले आहे की, महाराष्ट्रात महाविकासाघाडीकडून ‘अघोषित आणीबाणी’द्वारे लोकशाहीची हत्या ! सरकार विरोधात भुमिका मांडली म्हणून अर्णब गोस्वामींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून महाविकासआघाडी सरकारतर्फे सूडबुद्धीने करण्यात आलेल्या कार्यवाहीचा जाहीर निषेध ! लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारीता क्षेत्रावर हा मोठा आघात आहे.

लोकशाहीच्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढणारे सर्व ढोंगी पुरोगामी, सेक्युलर व तथाकथित निष्पक्ष पत्रकार या लोकशाहीच्या हत्येविरुद्ध, पत्रकारितेच्या गळचेपीविरुद्ध मौन बाळगून आहेत, असे म्हणत त्यांनी पत्रकारांवर टीका केली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here