‘तो’ सवाल करत राणेंचा घणाघाती प्रहार; म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्‍यांना बदनाम करु नये

मुंबई :

टीआरपी घोटाळ्यामुळे चर्चेत असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णव गोस्वामी याना २०१८ मध्ये घडलेल्या एका घटनेमुळे राहत्या घरातून सकाळी आठच्या सुमारास अटक करण्यात आल्याचे समजते. त्यांना मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी म्हटले की, राज्‍यात बलात्‍कारी, खुनी, अतिरेकी यांच्‍यावर कारवाई नाही. एकदा चौकशी दप्‍तरी दाखल झालेल्‍या प्रकरणात अर्णब गोस्‍वामी यांना अटक का? सरकारने सूडबुध्‍दीने ही कारवाई केली असून अर्णब गोस्‍वामी आणि कंगना राणावत यांना देण्‍यात आलेल्‍या वागणुकीचा मी निषेध करतो.

पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, या सरकारला जनहितासाठी राज्‍य चालविण्‍यात संपूर्ण अपयश आले असून अधिकाराचा स्‍वार्थी दुरुपयोग केला जात आहे. कायद्याची जाण आणि अंमलबजावणी करण्‍याची क्षमता ज्‍यांच्‍यामध्‍ये नाही त्यांनी शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्‍यांना बदनाम करु नये.

दरम्यान  भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, ज्यांनी आणीबाणी लादली, त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार… पत्रकारितेवरील हा सरकारपुरस्कृत हल्ला आहे. निर्भीड पत्रकाराला एका जुन्या केससाठी गजाआड केलं, द्वेशमूलक राजकारणाचा कळसं गाठला गेला आहे, असेच पापाचे घडे भरले की, सत्तेची मस्ती जनता उतरवेल.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here