‘त्या’ प्रकरणावरून प्रवीण दरेकरांची मविआ सरकारवर टीका; असेच पापाचे घडे भरले की…

मुंबई :

टीआरपी घोटाळ्यामुळे चर्चेत असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णव गोस्वामी याना २०१८ मध्ये घडलेल्या एका घटनेमुळे राहत्या घरातून सकाळी आठच्या सुमारास अटक करण्यात आल्याचे समजते. त्यांना मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, ज्यांनी आणीबाणी लादली, त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार… पत्रकारितेवरील हा सरकारपुरस्कृत हल्ला आहे, मी याचा तीव्र शब्दात निषेध करतो.

पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर यथेच्छ टीका केली. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने आज आणखी हीन पातळी गाठली… निर्भीड पत्रकाराला एका जुन्या केससाठी गजाआड केलं, द्वेशमूलक राजकारणाचा कळसं गाठला गेला आहे, असेच पापाचे घडे भरले की, सत्तेची मस्ती जनता उतरवेल.

दरम्यान  भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मविआ सरकारवर नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले की, न्याय नीती सोडून अभिमन्यूला चक्रव्यूहात घेरणाऱ्यांनो तयार रहा… भीमाची गदा निश्चित हिशोब चुकते करेल, जेव्हा कुरुक्षेत्रात मांड्या फुटतील तेव्हा बांगड्या फोडू नका.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here