तर आज तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असता; वाचा बराक ओबामांच्या पत्नीचा हा भन्नाट किस्सा

आज अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. बिडेन आणि ट्रम्प या दोघांपैकी एक जण राष्ट्राध्यक्ष होणार आहे. यानिमित्ताने आठवलेला हा जुना किस्सा आपल्यासमोर आणत आहोत. हा किस्सा आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा अणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांचा.   

“एका संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा अणि त्यांची पत्नी मिशेल सहज गम्मत म्हणून एक सर्वसाधारण हॉटेल मध्ये जेवायला गेले होते. हॉटेलचा मालक त्यांच्या जवळ आला अणि राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना फार आदबिने विचारले, “महोदय मी तुमच्या पत्नीशी जरा खाजगित बोलू शकतो का..”

ओबामा थोडे आश्चर्यचकित झाले कारण त्यांना वाटले हा व्यक्ती माझ्याशी बोलायला आला आहे.

ओबामांनी मनमोकळेपणे होकार दिला. कारण तेथील संस्कृतीत असे सहजपणे खाजगीत बोलणे हे या विशेष काही नाही. त्या दोघांचे थोडे बोलणे झाले. नंतर मिशेल या पुन्हा बराक यांच्यापाशी येऊन बसल्या.

मग बराक ओबामांनी तिला उत्सुकतेने विचारले ” असं काय विशेष की त्याला तुझ्याशी खाजगित बोलवेसे वाटले..?”

तेव्हा मिशेल यांनी सांगितले की, माझ्या तरुणपणी हा माझ्याशी लग्न करण्यासाठी अगदी वेडा झाला होता. त्यावर बराक ओबामांनी एकदम हसरी प्रतिक्रिया देत म्हटले की, अगं बरं झालं असतं नां. आज तू ह्या छान हॉटेलची मालकींण असतीस.

तेव्हा मिशेल हसतच परंतु फार आत्मविश्वासाने बोलल्या, “अजिबात नाही..जर त्याने माझ्याशी लग्न केलं असतं तर आज तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असता.”

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here