अर्णबच्या अटकेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आक्रमक प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई :

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात स्वतःचा न्यायाधीश असल्यासारखी वक्तव्ये करत थेट स्टुडीओत बसून न्यायदानाची भूमिका बजावणाऱ्या ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली.  याच पार्श्वभूमीवर अनेक भाजप नेत्यांनी आक्रमक होत आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या प्रकरणावरून कॉंग्रेससह महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

रिपब्लिक टीव्ही अर्णव गोस्वामी यांच्याविरूद्ध राज्याने सत्तेचा गैरवापर करणे हा वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे. ही स्थिती आणीबाणीची आठवण करून देते. स्वतंत्र प्रेसवरील या हल्ल्याचा विरोध केला जाईल, असे म्हणत अमित शहा यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सत्तेचा गैरवापर केला आहे, असा आरोपही यावेळी शहा यांनी केला.

का झाली आहे अटक :-

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्नबला अटक करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याआधी अन्वय नाईक यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांचे नाव होते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here