म्हणून अर्णवला झालीय अटक; पहा भाजप आमदारांनी काय केलाय दावा

रिपब्लिक टीव्हीचे सर्वेसर्वा आणि आपल्या वेगळ्या स्टाईलने टीव्हीवर आवाज वाढवत बोलण्याच्या पद्धतीमुळे प्रसिद्ध असलेल्या अर्णव गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यावर भाजपने ही राजकीय स्वरुपाची अटक असल्याचे म्हटले आहे.

भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी याबाबत संताप व्यक्त करताना फेसबुक पेजवर भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सत्ता तडजोड करून मागच्या दाराने मिळवली, सत्तेला जनाधार नसला की सत्तेविरुद्ध उठणारा लहानसा आवाजही घाबरवून सोडतो. राज्य सरकारची उडालेली भंबेरी याचीच प्रचिती देते. पालघर येथील साधूंना संरक्षण न देऊ शकलेले गृहमंत्रालय एका पत्रकाराला मात्र मोठा फौजफाटा पाठवून अटक करतं तेही २०१८ पूर्वीच्या एका प्रकरणात. प्रत्येकाला अर्णब गोस्वामी यांच्या पत्रकारितेशी सहमत असण्याचे किंवा नसण्याचे स्वातंत्र्य आहे पण कोणाविरोधातही पदाचा, अधिकारांचा गैरवापर करण्याचा अधिकार सत्ताधाऱ्यांना नाही. विद्यमान राज्य सरकार न्यूनगंडाने पछाडलेले आहे. राज्य सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here