फडणवीस संतापले; आणीबाणीशी केली अर्णव प्रकरणाची तुलना

रिपब्लिक टीव्हीचे सर्वेसर्वा आणि आपल्या वेगळ्या स्टाईलने टीव्हीवर आवाज वाढवत बोलण्याच्या पद्धतीमुळे प्रसिद्ध असलेल्या अर्णव गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यावर माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

त्यांनी फेसबुक पेजवर म्हटले आहे की, आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे.

एकूणच अर्णव यांची अटक भाजपला खूप झोंबली आहे. आर्थिक फसवणूक आणि त्यामुळे झालेल्या आत्महत्या प्रकरणातून ही अटक झालेली आहे. उलट पोलिसांनी खूप वर्षांनी याची दखल घेऊन अटक केल्याने राज्यभरातून मुंबई पोलिसांचे कौतुक होत आहे. त्याचवेळी भाजपच्या अनेक कार्यकर्ते व समर्थकांनी ही अटक राजकीय स्वरुपाची आणि हिंदुत्ववादी मंडळींना लक्ष्य करणारी असल्याचे म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here