‘तुझ्यासोबत राहावेना आणि तुझ्याशिवाय करमेना’ अशा नात्यावरील हे निखळ विनोद वाचा आणि पोटभर हसा

१) लग्नाच्या 18 वर्षानंतर…
बायको – माला पिझ्झा खायचा आहे.
नवरा पिझ्झा आणून देतो.
बायको – थँक्स.
नवरा – फक्त थँक्स?
बायको लाजून – इश्श, मग काय आता i love you वगैरे म्हणू का?
नवरा – फालतूपणा करू नकोस! अर्धा – अर्धा कर! नाय तर एका बुक्कीत दात पाडीन.. 

२) नवरा बायको समोरासमोर बसून जेवण करत होते.  जेवण झाल्यावर नवरा उठला आणि त्याने स्वतःचे ताट धुवून आणले.

बायको नवर्‍याकडे रागाने पाहत म्हणाली… केला ना इज्जतीचा कचरा …. आपण आपल्या घरी नाही आहोत. बाहेर हॉटेलमध्ये जेवायला आलो आहोत.

३) नवरा : कुठे गेली होतीस?

बायको : रक्तदान करायला

नवरा : हे बरोबर नाही… माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं.. 

४) हल्लीच्या बायका नवऱ्याच्या छातीवर डोकं ठेवून हळूच विचारतात

डियर, माझ्या आधी तुझ्या आयुष्यात कोणी होती का रे?

तुमचे उत्तर इथे महत्त्वाचे नसते तर महत्वाचे असतात तुमच्या हृदयाचे वाढणारे ठोके

तेव्हा हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवायला शिका.. 

५) बायको: तुम्ही मला कधी सोनं, हिरे किवा मोती का नाहीं देत हो?

नवरा तिला जमिनीवर ची माती उचलुन देतो

बायको (रागात): हे काय..?

नवरा : मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हिरे मोती।।

नवरा गेल्या तीन दिवसांपासुन उपाशी आहे.

६) 13 वर्ष केस चालली तरी पण कोर्टाला कळले नाही
की सलमान दारु प्याला होता की नाही.

आणि आमच्या बायका…

नुसतं phone वर hello म्हटलं की,
कमी प्या आणि लवकर या घरी ….असं म्हणतात.. 

७) एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो,
तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले,

बायको: काय आहे?

नवरा: या २ वायरांपैकी एक धर जरा..

बायको: हं धरली,

नवरा: काही जाणवलं का?

बायको: नाही,

नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे….सोड आता

८) नवरा: आज जेवायला काय बनवतेस?

बायको: आमरस, चपाती, वरण, शेवग्याची आमटी, वांग्याचे भरीत,
आळुच्या वड्या, मेथीची भाजी, कांदा भजी, कोशिंबीर, खोब-याची चटणी आणि मसाला ताक.

नवरा: चटणी भाकर वाढ पण असं मोदीसारखं गंडवू नको…

९) नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील?

बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल तु खुश मी पण खुश…

नवरा: 20 रुपयांची लागली आहे, हे घे 10 रूपये आणि चल निघ…

१०) या दोन वाक्यांनी मी पुरता गोंधळून गेलोय…

बायका नेहमी म्हणतात की “पुरुष मूर्ख आहेत”….
पण बायका हेदेखील म्हणतात की,

“आम्ही पुरूषांपेक्षा काही कमी नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here