‘या’ देशाची मोठी कारवाई; एअरस्ट्राईक करून ५० दहशतवाद्यांचा खात्मा

दिल्ली :

काही दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये कट्टरपंथी तरुणाने शिक्षकाची हत्या केली. त्यानंतर चर्चमध्ये भयंकर चाकू हल्ला केला. अशा वाढत्या घटना रोखण्यासाठी राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या काही आठवडय़ांपासून फ्रान्सने  कट्टवाद्यांविरुद्ध आणि दहशतवाद्यांवर ऑपरेशन सुरू केले आहे.  फ्रान्सने दहशतवाद्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतआफ्रिकन देश मालीमध्ये एअरस्ट्राईक केला. हवाईदलाच्या मिराज लढाऊ विमानांनी मिसाईल हल्ले चढविले. त्यात अल-कायदाच्या 50 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.

हवाईदलाने 30 ऑक्टोबरला ही धडक कारवाई केली, अशी माहिती फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेंस पार्ले यांनी दिली आहे.  कारवाईत 50 दहशतवादी ठार झाले तर  मोठय़ा शस्त्रसाठय़ांचेही नुकसान झाले. स्पह्टके, आत्मघाती हल्ल्यासाठी वापरण्यात येणारे कोट जप्त करण्यात आले असून, चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आले आहे.

आफ्रिकन देश माली, शेजारील बुकाaन फासो आणि नायजर या लहान देशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून अल-कायदा आणि इसिसने रक्तरंजित हिंसाचार सुरू केला आहे. माली येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती सेनेचे सैनिक तैनात आहेत. त्यात फ्रान्सचेही 2500 वर सैनिक आहेत. मालीच्या सीमेवर दहशतवादी असल्याचे फ्रान्सच्या ड्रोन कॅमेराने टिपले. दहशतवाद्यांनी मोठय़ा प्रमाणावर मोटारसायकल जमा केल्याचेही कॅमेरात दिसले. त्यानंतर फ्रान्सने ऑपरेशन सुरू केले.
दोन मिराज फायटर जेट आणि मिसाईलवाहू ड्रोनमधून हल्ले करण्यात आले.  हल्ल्यात 50हून अधिक दहशतवादी ठार झाले. खात्मा करण्यात आलेले दहशतवादी अल-कायदाच्या संबंधित गट अंसार-उल-इस्लामचे आहेत, अशी  संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.  

संपादन : वैष्णवी शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here