मुंबई :
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात स्वतःचा न्यायाधीश असल्यासारखी वक्तव्ये करत थेट स्टुडीओत बसून न्यायदानाची भूमिका बजावणाऱ्या ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आपलेही नाव थेट गुंतलेले आहे याचा विसर त्यांना पडला होता. २०१८ ची अन्वय नाईक यांची केस ओपन झाली आणि अर्नब यांना अटक करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
ते म्हणाले की, एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णीला अटक… सरकार विरोधात सोशल मिडियावर बोलणाऱ्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचेच झाले… आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या… वा रे वा लोकशाही सरकार!
पुढे बोलताना त्यांनी ‘लोकशाहीचा आजचा काळा दिवस’ असल्याचे सांगितले. तसेच हे सरकार काँग्रेसच्या सहवासात बिघडलेले असल्याचेही ते म्हणाले. ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार?, असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र आणिबाणीच्या दिशेने? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राष्ट्रवादीसह मविआ सरकारला टोलाही हाणला आहे.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- त्यामध्ये भारताची फ़क़्त ओएनजीसी; युरोप व अरबस्तानातील दहा कंपन्यांचा वाटा 45 टक्के.!
- पांढरेच नाही तर रंगीतही सोने; पुन्हा फुलणार भारतात रंग, पहा नेमके काय संशोधन झालेय ते
- पुणे, वडूज, सांगलीत ज्वारीने खाल्लाय भाव; वाचा महाराष्ट्रात कुठे व किती आहे भाव
- टोमॅटो मार्केट अपडेट : पहा, आजचे ताजे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा, आजचे लाल व उन्हाळचे भाव